Havaman Andaj 2024 : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर ऑगस्टच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ माजवला होता. राज्यातील अनेक भागांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
पण आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झाला आहे. राज्यातील पाऊस आता जवळपास पुन्हा एकदा गायब झाला असल्याचे दिसत आहे. मात्र राज्यातून पाऊस कमी झाला असला तरी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावत आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत. आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने आज राज्याच्या कोकण, मध्य महाराष्ट्र अन विदर्भ विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर फारच कमी राहणार आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिप पाहायला मिळू शकते. तथापि राज्याच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे.
गेल्या 24 तासात राज्याच्या कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर आणि विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे पुढील 24 तास देखील या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने या संबंधित विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मात्र उर्वरित राज्यात पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते याचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोकणातील रायगड मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
पण पुणे जिल्ह्याच्या फक्त घाटमाथा परिसरावर पावसाचा जोर अधिक राहणार आहे. जिल्ह्याच्या उर्वरित भागात मात्र पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. परंतु विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील यासंबंधी जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यालाही येलो अलर्ट देण्यात आला आहे.