Havaman Andaj 2023 : हवामानातील बदलामुळे महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील जळगाव हे शहर महाबळेश्वरपेक्षा थंड शहर बनले आहे. जळगावातील सकाळचे तापमान हे विक्रमी कमी झाले आहे. याचा परिणाम म्हणून खानदेश नगरीत बोचरी थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे.
जळगाव प्रमाणेच राज्यातील इतरही भागात सकाळच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तथापि राज्यात अजूनही थंडीची म्हणावी तशी तीव्रता पाहायला मिळालेली नाहीये. मात्र आगामी काळात थंडीची तीव्रता वाढणार असे सांगितले जात आहे.
दरम्यान देशाच्या राष्ट्रीय राजधानीत, दिल्लीत देखील आता किंचित गुलाबी थंडी जाणवत आहे. पण दिवसाचे कमाल तापमान अजूनही सरासरी एवढेच आहे. कमाल तापमानात अजूनही घट होत नाहीये. त्यामुळे जोपर्यंत कमाल तापमान कमी होत नाही तोपर्यंत थंडीची तीव्रता जाणवणार नाही असे मत व्यक्त होत आहे.
आगामी काळात मात्र कमाल तापमान देखील कमी होणार आहे यात शंकाच नाही. अशातच आता भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे.
काय म्हणतंय हवामान विभाग ?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, पुढील काही दिवस देशाच्या अनेक भागांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. पण काही भागात पावसाची शक्यता आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हलक्या पावसाचीही शक्यता आय एम डी ने वर्तवली आहे.
तमिळनाडू, केरळ आणि माहे येथे 27 ते 30 ऑक्टोबर आणि दक्षिण आतील कर्नाटकात 29 आणि 30 ऑक्टोबरला मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील चार दिवस केरळमध्ये सर्व ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद होईल, असे विभागाने म्हटले आहे.
हवामान खात्याने सांगितले की, येत्या दुसऱ्या आठवड्यात दक्षिण आंध्र प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडू, केरळसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत देशातील काही राज्यात आता गुलाबी थंडीची जाऊ लागली आहे तर काही ठिकाणी पावसाच्या सऱ्या सुरू आहेत.