Havaman Andaj 2023 : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपूर्वी ऑक्टोबर हिटचा मोठा प्रकोप पाहायला मिळत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. हवामानात असा चेंज आला आहे की, आता राज्यातील बहुतांशी भागात पहाटे-पहाटे थंडीची तीव्रता वाढत आहे.
पहाटेच्या किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे. यामुळे थंडीची चाहूल लागली आहे. हवामान खात्याने देखील येत्या काही दिवसात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे सांगितले आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला होता आणि यामुळे अंगाची अक्षरशा लाही-लाही होत होती.
यामुळे आता हिवाळ्याला केव्हा सुरुवात होणार, थंडीची तीव्रता केव्हा वाढणार हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात होता. अशातच आता हळूहळू थंडीची तीव्रता वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळत आहे. अशातच भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून एक नवीन आणि सुधारित हवामान अंदाज समोर आला आहे.
सदर हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे कमी दाबाचे क्षेत्र लवकरच चक्रीवादळात रुपांतरीत होईल आणि याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
या चक्रीवादळामुळे राज्यातील उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस पडेल असा अंदाज आहे. एकंदरीत महाराष्ट्रात दिवाळीच्या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. वास्तविक, नुकत्याच काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात तेज नावाचे चक्रीवादळ तयार झाले होते. याशिवाय बंगालच्या उपसागरात हामून नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.
मात्र, या दोन्ही चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम झालेला नाही. पण नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे हे कमी दाब क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित होईल आणि यामुळे महाराष्ट्रात दिवाळीच्या कालावधीत पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरतो का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.