Greenfield Expressway : सध्या भारतभर महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि देशभरातील विविध राज्य शासनाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत.
केंद्र शासनाने तर देशभरात महामार्गांचे जाळे तयार करण्यासाठी भारतमाला परियोजना नामक एक महत्वकांक्षी परियोजनेचे काम हाती घेतले आहे. या परियोजने अंतर्गत देशात तीन हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार केले जाणार आहेत.
या परिवर्तन अंतर्गत आपल्या महाराष्ट्रात देखील काही महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून देखील राज्यात शहरा-शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी काही नवीन महामार्ग तयार केले जाणार आहेत.
महाराष्ट्र राज्य शासन उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबई दरम्यान समृद्धी महामार्ग तयार करत आहे. सध्या या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या वर्षी अखेर पर्यंत किंवा नवीन वर्षात हा संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
यासोबतच नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग तयार केला जाणार आहे. यासोबतच उत्तर प्रदेश राज्यात देखील योगी सरकारने महामार्गांचे जाळे तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेश मध्ये गोरखपुर ते शामली दरम्यान एका नवीन महामार्गाची निर्मिती केली जाणार आहे.
गोरखपूर ते श्यामली दरम्यान सातशे किलोमीटर लांबीचा महामार्ग विकसित होणार आहे. हा महामार्ग 22 जिल्ह्यांमधून आणि 37 तालुक्यांमधून जाणार आहे. यामुळे उत्तर प्रदेशमधील कनेक्टिव्हिटी आणखी सुधारणार आहे.
शामली-गोरखपूर इकॉनॉमिक कॉरिडॉर हा यूपीचा तिसरा सर्वात मोठा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे असेल आणि तो यूपीच्या 22 जिल्हे आणि 37 तहसीलमधून प्रस्तावित करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे गोरखपूर-शामली एक्सप्रेसवे हा पंजाब नॉर्थ ईस्ट कॉरिडॉरचा एक भाग राहणार आहे. या एक्स्प्रेस वेमुळे संपूर्ण परिसरात रस्ते जोडणी आणि व्यावसायिक क्रियाकलापांना चालना मिळणार असा दावा केला जात आहे. यामुळे उत्तर प्रदेश राज्याचा एकात्मिक विकास सुनिश्चित होणार आहे.
हा एक्सप्रेसवे शामली जिल्ह्यातील गोगवान जलालपूर येथून सुरू होऊन गोरखपूरपर्यंत जाणार आहे. गोरखपूर-शामली ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे अयोध्या, संत कबीरनगर, बाराबंकी, गोंडा, बस्ती, बहराइच, लखनौ, सीतापूर, शाहजहांपूर, हरदोई, बदायूं, बरेली, रामपूर, मुरादाबाद, संभल, अमरोहा, बिजनौर, मेरठ, मुझफ्फरनगर आणि सहारनपूरमधून जाणार आहे.