Green Chilli Farming : भारतात अलीकडे मोठ्या प्रमाणात भाजीपाला वर्गीय पिकांची शेती होऊ लागली आहे. भाजीपाला वर्गीय पिके अर्थातच तरकारी पिकांची आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेती होत आहे. कमी कालावधीत या पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देखील मिळत आहे.
हिरव्या मिरचीचे देखील आपल्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हिरव्या मिरचीला मार्केटमध्ये कायम मागणी असते. हिरव्या मिरचीचा वापर भारतीय स्वयंपाक घरात मोठ्या प्रमाणात केला जातो.
यामुळे मार्केटमध्ये हिरव्या मिरचीला बारा महिने मागणी असते. परिणामी याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. तथापि, हिरव्या मिरचीच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी याच्या सुधारित वाणाची लागवड करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिलेला आहे.
कोणत्याही पिकातून जर चांगले विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर त्या पिकाच्या सुधारित वाणाची लागवड करणे आवश्यक असते. हिरव्या मिरचीच्या बाबतीतही तसेच आहे.
यामुळे आज आपण हिरव्या मिरचीच्या अशा एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
912 गोल्ड वाण
हिरव्या मिरचीचा हा एक सुधारित वाण आहे. या जातीची लागवड महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये केली जाते. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादनही मिळत आहे. हा हिरव्या मिरचीचा एक हायब्रीड वाण आहे.
त्यामुळे यातून चांगल्या दर्जेदार उत्पादन मिळते. या जातीच्या मिरच्या साधारणतः आठ ते दहा सेंटिमीटर लांबीच्या असतात. ही हिरवी मिरची लोंगी मिरचीच्या तुलनेत कमी तिखट असते. त्यामुळे या जातीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
हॉटेल इंडस्ट्री मध्ये देखील या जातीच्या मिरचीला मोठी मागणी असते. कमी तिखट खाणारे लोक या मिरचीचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात. या जातीच्या मिरचीसाठी आपल्या महाराष्ट्रातील हवामान पूरक असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे.
यामुळे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना या जातीपासून चांगले उत्पादन मिळत आहे. निश्चितच जर तुमचाही हिरव्या मिरचीच्या लागवडीचा प्लॅन असेल तर या जातीच्या मिरचीची लागवड तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
याची लागवड बारा महिने केली जाऊ शकते. तथापि या वाणाची लागवड करण्याआधी हे वाण तुमच्या भागातील जमिनीत चांगले येणार की नाही ? याची चाचपणी तुम्ही नक्कीच केली पाहिजे.