Green Chilli Farming : गेल्या काही वर्षांमध्ये पारंपारिक पिकांच्या लागवडीबरोबरच भाजीपाला लागवडीचे क्षेत्र देखील वाढले आहे. यात मिरची लागवडी खालील क्षेत्र देखील वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. खरेतर बाजारात हिरवी आणि लाल मिरची दोघांना मोठी मागणी आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव हिरवी आणि लाल अशा दोन्ही मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात.
हिरव्या मिरचीच्या उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर राज्यातील अनेक शेतकरी बांधव पारंपारिक पिकांसोबतच हिरव्या मिरचीची शेती करून चांगले उत्पादन मिळवत आहेत.राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हिरव्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते.
तथापि, हिरव्या मिरची पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी याच्या सुधारित जातीची लागवड करण्याचा सल्ला या ठिकाणी कृषि तज्ञांनी दिलेला आहे. अशा परिस्थितीत, आज आपण हिरव्या मिरचीच्या अशाच एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुसा सदाबहार हिरवी मिरचीचे वाण ठरणार फायदेशीर
हिरव्या मिरचीची पुसा सदाबहार ही जात विक्रमी उत्पादन देणारी जात म्हणून ओळखली जाते. या जातीच्या हिरव्या मिरचीची देशभरात मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे.
या जातीची बारा महिने लागवड केली जाऊ शकते. या जातीला वर्षातून दोन ते तीनदा बहार येतो. या जातीचे पीक सरासरी 150 ते 200 दिवसात परिपक्व होत असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केलेला आहे.
या जातीपासून हेक्टरी 35 क्विंटल पर्यंतचे दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते. खरंतर, मिरचीची आपल्याकडे खरीप आणि रब्बी या दोन हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
बाजारात हिरव्या मिरचीला नेहमीच मागणी असते. शिवाय हिरव्या मिरचीला बाजारात चांगला भावही मिळतो. त्यामुळे अनेकजण पारंपारिक पिकांच्या लागवडी बरोबरच हिरव्या मिरचीची देखील लागवड करतात.
जर तुम्हीही हिरवी मिरची लागवड करण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी पुसा सदाबहार हे हिरवी मिरचीचे सुधारित वाण फायदेशीर ठरू शकते. ही जात विविध रोगांना आणि कीटकांना प्रतिकारक आहे.
अर्थातच या जातीच्या हिरवी मिरची पिकावर रोगांचा आणि कीटकांचा कमी प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चात अधिकचे उत्पादन मिळवता येणे शक्य होते.
यामुळे जर तुम्हीही कमी कालावधीत चांगली कमाई करण्याच्या तयारीत असाल तर या जातीची हिरवी मिरची लागवड करून चांगले उत्पादन या ठिकाणी मिळवू शकणारा आहात.