Grape And Tomato Farming : देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरे तर आपल्या देशात भाजीपाला अन फळ पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. टोमॅटो, मिरची, फ्लॉवर, कोबी, मेथी अशा विविध भाजीपाल्यांची आपल्याकडे लागवड होते. तसेच द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, केळी सारख्या फळ पिकांची देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे.
द्राक्षाबाबत बोलायचं झालं तर याची लागवड आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त होते. राज्यातील नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादन हे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच अधिक आहे.
हेच कारण आहे की नाशिक शहराला वाईन सिटी म्हणून ओळखले जाते. खरंतर द्राक्ष हे एक प्रमुख फळपीक असून याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळत आहे.
तथापि अनेकदा वेगवेगळ्या कीटकांमुळे आणि रोगांमुळे द्राक्ष पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही आणि यामुळे त्यांचे मोठे नुकसान होते.
यामुळे द्राक्ष पिक उत्पादित करण्यासाठी विविध औषधांचा शेतकऱ्यांना वापर करावा लागतो. द्राक्ष पिकावर बुरशीजन्य रोगांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळतो.
यामुळे या रोगांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकाची फवारणी ही शेतकऱ्यांना करावी लागते. सिजेंटा या देशातील एका बड्या कंपनीने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता एक नवीन बुरशीनाशक लॉन्च केले आहे.
हे बुरशीनाशक फक्त द्राक्ष पिकासाठी फायद्याचे ठरणार असे नाही तर याचा उपयोग मिरची, टोमॅटो आणि भुईमूग पिकासाठी ही होणार आहे. सध्या स्थितीला हे बुरशीनाशक मिरची, टोमॅटो, भुईमूग आणि द्राक्ष पिकासाठी शिफारशीत करण्यात आले आहे.
मात्र भविष्यात इतरही पिकांसाठी या बुरशीनाशकाची शिफारस केली जाणार अशी आशा आहे. यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिजेंटा कंपनीने मिराव्हिस ड्युओ हे अत्याधुनिक बुरशीनाशक तयार केले आहे.
हे अलीकडेच लॉन्च झालेले बुरशीनाशक टोमॅटो, मिरची, भुईमुग आणि द्राक्ष या पिकांसाठी शिफारस करण्यात आले आहे. हे फंगीसाईड Powdery Mildew म्हणजे भुरी, Anthracnose म्हणजे करपा आणि Leaf Spots म्हणजे पानांवरील ठिपके यांसारख्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यास सक्षम राहणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे उत्पादन मिळवता येईल अशी आशा आहे. या बुरशीनाशकाचा टोमॅटो, मिरची, द्राक्ष सारख्या पिक उत्पादनाला फायदा होणार आहे.