Government Scheme : गेल्या काही वर्षांपासून देशात महागाई भस्मासुरासारखी वाढत आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत आहे. याचा परिणाम इतरही वस्तूंच्या महागाईवर होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देशात सातत्याने वाढत आहेत. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. या महागाईच्या काळात आता नोकरदार वर्गाला आपला पगार सुद्धा पुरत नाहीये.
यामुळे सर्वसामान्यांमध्ये केंद्रशासनाविरोधात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. साधारणता एक ते दीड महिनापूर्वी देशात टोमॅटोच्या बाजारभावात मोठी वाढ झाली होती. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर शंभर रुपये प्रति किलोपेक्षा अधिक झाले होते. आता गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
खाद्यतेलाच्या किमती तेजीत आहेत यासोबतच गव्हाच्या किमती देखील सातत्याने वाढत आहेत. एकंदरीत महागाईमुळे सर्वसामान्य जनता पूर्णपणे भरडली जात आहे. दरम्यान देशात वाढत असलेली ही महागाई आगामी लोकसभा आणि काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारला अडचणीत आणणार असे मत व्यक्त होत आहे. हेच कारण आहे की सरकारकडून आता सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून नुकत्याच काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या होत्या. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गॅस सिलेंडरवर दिल्या जाणाऱ्या सबसिडीमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. अशातच आता केंद्र सरकार आणखी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेणार असे वृत्त समोर आले आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आता देशातील गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी गव्हाचे पीठ स्वस्तात उपलब्ध करून दिले जाणार आहे.खरंतर सध्या बाजारात गव्हाचे पीठ 35 रुपये प्रति किलो आणि ब्रेड साठीच्या गव्हाच्या पिठाचा भाव 40 ते 50 रुपये प्रति किलो एवढा आहे. पण आता सर्वसामान्यांना स्वस्तात गव्हाचे पीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. सरकार स्वस्त दरात सर्वसामान्यांना गव्हाचे पीठ पुरवणार आहे.
सरकार काय भावात विकणार गव्हाचे पीठ ?
सरकारकडून भारत ब्रँड अंतर्गत गव्हाच्या पिठाची विक्री केली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे सरकारकडून फक्त 27 रुपये आणि 50 पैसे प्रति किलो या भावात गव्हाच्या पिठाची विक्री होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही मात्र लवकरच अंतिम निर्णय होणार आहे. याची जबाबदारी राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघावर सोपवली जाणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, यासाठी भारतीय अन्न महामंडळ म्हणजे FCI अडीच लाख टन गव्हाचा पुरवठा करणार आहे आणि या गव्हाचे पीठ तयार करून हे पीठ 27.50 रुपये प्रति किलो या दरात याची विक्री होणार आहे. विशेष म्हणजे गव्हाचे पीठ 10 आणि 30 किलोची पॅकींग करून विक्री केली जाणार असे सांगितले जात आहे.
कशी असणार विक्री व्यवस्था
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ नाफेड, राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ, केंद्रीय भांडार आणि सफल या सरकारी संस्था या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या विक्रीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या संबंधित संस्थेच्या विक्री केंद्रांमधून गव्हाच्या पिठाची विक्री होणार असे सांगितले जात आहे.
तसेच केंद्राच्या या योजनेतून स्वस्त गव्हाचे पीठ राज्य सरकारना त्यांच्या कल्याणकारी योजनेसाठी आणि पोलिस तसेच कारागृहाला पुरवले जाणार असे बोलले जात आहे. याशिवाय, इतरही अन्य सहकारी संस्थामार्फत आणि महामंडळामार्फत गव्हाच्या पीठाची विक्री होणार असे मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगितले जात आहे.
केव्हापासून होणार विक्री?
गव्हाचे पीठ स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून विचार सुरू आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु लवकरच याबाबत निर्णय होईल आणि याच महिन्यात याची अंमलबजावणी सुरू होईल. या चालू महिन्याच्या सात तारखेपासून याची अंमलबजावणी सुरू होऊ शकते. यामुळे आता केंद्र सरकारकडून या योजनेला केव्हा सुरुवात होते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.