Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहे. अशातच आता या चालू सप्टेंबर महिन्यात केंद्र शासनाकडून देशातील काही नागरिकांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली जाणार आहे.
17 सप्टेंबरला अर्थातच विश्वकर्मा जयंती दिनी देशभरातील कारागिरांसाठी एक महत्वाची योजना सुरू करण्याचे नियोजन केंद्रातील मोदी सरकारने आखले आहे. या दिवशी देशभरातील तीस लाख कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना सुरू केली जाणार आहे.
विश्वकर्मा जयंती दिनी सुरू होणारी ही योजना देशभरातील कुशल कारागिरांसाठी खूपच महत्त्वाची राहणार आहे. विशेष बाब अशी की 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील वाढदिवस असतो. यावर्षी नरेंद्र मोदी आपला 73 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील कारागिरांना दिलासा देण्यासाठी विश्वकर्मा योजना सुरू करण्याचे नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. या योजनेसाठी केंद्रातील मोदी सरकारने 13000 कोटी रुपयांची तरतूद केली असून या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कारागिरांना प्रशिक्षित केले जाणार आहे.
एवढेच नाही तर कुशल कारागिरांना विना गॅरंटी कर्जदेखील पुरवले जाणार आहे. देशभरातील सोनार, लोहार, धोबी यांसारख्या इत्यादी कारागिरांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या अंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात एक लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे.
यानंतर दुसऱ्या टप्प्यात कारागिरांना दोन लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत कारागिरांना दोन टप्प्यात तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे या कर्जासाठी केवळ पाच टक्के व्याजदर आकारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
खरंतर या योजनेची घोषणा 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केली होती. आता या योजनेला 17 सप्टेंबर पासून म्हणजेच विश्वकर्मा जयंती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरू केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेच्या माध्यमातून देशातील 30 लाख छोट्या कारागिरांना लाभ पुरवला जाणार आहे.
कारागिरांना या अंतर्गत कोणत्याही हमीशिवाय कर्ज उपलब्ध होणार आहे. कारपेंटर, सुतार, मेकॅनिक, प्लंबर, लोहार, सोनार इत्यादी कारागिरांना या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. वित्त मंत्रालय, कौशल्य विकास आणि एमएसएमई यांच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे.