Government Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. वर्तमान शिंदे सरकारने देखील सत्ता स्थापित केल्यापासून आत्तापर्यंत शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, कर्मचारी अशा विविध घटकांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले आहेत.
विशेषता शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर अधिक जोर दिला जात आहे. महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न होत आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आणि स्त्री शिक्षणाला चालना मिळावी म्हणून आता राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
यामुळे स्त्री-शिक्षणाला चालना मिळणार आहे यात शंकाच नाही. खरे तर भारत वेगाने विकसित होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आता जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
विशेष म्हणजे ही अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र असे असले तरी आजही स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेद केला जातो.
हळूहळू ही परिस्थिती बदलत आहे मात्र वास्तविकता नाकारून चालणार नाही. हेच कारण आहे की, शासनाच्या माध्यमातून स्त्रियांना सर्वच क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे.
अशातच आता शिंदे सरकारने 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी उच्च शिक्षण घेत असलेल्या मुलींना शुल्क माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकार शैक्षणिक संस्थाना या खर्चाची परतफेड करेल.
जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षणात याव्यात यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. खरेतर, आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षणासाठी 50 टक्के एवढी शुल्क सवलत दिली जात होती.
मात्र आता ही शुल्क सवलत 100% पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे आता कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण घेता येणार आहे. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल अर्थातच 2 फेब्रुवारी 2024 ला ही माहिती दिली आहे.