Government Scheme : महाराष्ट्र राज्य शासन राज्यातील नागरिकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची घोषणा करत असते. सध्या स्थितीला राज्यात अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फायदा मिळत आहे.
राज्य शासनाने राज्यातील नागरिकांसाठी अशी एक योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत जर पत्नीचा बाळातपणात मृत्यू झाला तर तिच्या पतीला दोन लाख रुपये मिळतात.
गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना असे या योजनेचे आहे. ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
या राज्य शासनाच्या योजनेच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते वाहन अपघात इत्यादी कारणांमुळे जर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला किंवा त्यांना अपंगत्व आले तर त्यांना सानुग्रह अनुदान पुरवले जात आहे.
अपघातग्रस्त शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान दिले जात आहे. दरम्यान या योजनेच्या बाबत राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
या कल्याणकारी योजनेत आता महत्त्वाचा बदल झाला आहे. राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढवली आहे.
या नव्याने झालेल्या बदलानुसार आता महिला शेतकऱ्याचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास वारस म्हणून तिच्या पतीला दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
किती अनुदान मिळत ?
अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास आणि शेतकरी महिलेचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास २ लाख रुपये एवढे सानुग्रह अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये एवढे आर्थिक साहाय्य राज्य शासनाच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना किंवा शेतकरी कुटुंबाला दिले जाणार आहे.
निश्चितच राज्य शासनाने या योजनेमध्ये केलेला बदल हा राज्यातील शेतकरी कुटुंबासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. संकटाच्या काळात या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला जाणार आहे.