Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महिलांसाठी देखील शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. राज्यातील शिंदे सरकारने अलीकडेच महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे.
2014 मध्ये सत्ता स्थापित केलेल्या नरेंद्र मोदी सरकारने सुद्धा महिलांसाठी असंख्य योजना काढल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
लखपती दीदी योजना ही देखील अशीच एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जात आहे. शासन या योजनेअंतर्गत महिलांना तब्बल पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देते.
महत्त्वाची बाब अशी की या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज हे बिनव्याजी असते. दरम्यान आता आपण लखपती दीदी योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कशी आहे लखपती दीदी योजना
लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना व्यवसाय सुरू करता यावा यासाठी मदत दिली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम देखील राबवला जात आहे.
याच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय संबंधित अनेक पैलू शिकवल्या जातात. महिलांना ट्रेनिंग देऊन रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
लखपती दीदी योजना अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यापासून ते त्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यापर्यंत सर्व गोष्टी शिकवल्या जातात. या अंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळते.
योजनेच्या पात्रता काय आहेत
या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त भारतीय महिलांना मिळतो. म्हणजेच भारतातील रहिवासी महिलाचं यासाठी पात्र ठरतात. याचा लाभ 18 ते 50 वयोगटातील महिलांना मिळतो. पण सर्वच महिला यासाठी पात्र नसतात.
बचत गटात सहभागी असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळतो. कोणत्याही बचत गटात सहभागी असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र ठरतात. या योजनेतून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर महिलांना सर्वप्रथम अर्ज सादर करावा लागतो.
यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. बिझनेस प्लॅन देखील सादर करावा लागतो. आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम प्रूफ, बँक पासबुक याचसोबत अर्जदाराचा मोबाईल नंबर आणि फोटो द्यावा लागतो.