Government Scheme : भारत हा एक कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. साहजिक देशातील अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायावर आधारित आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मायबाप शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. सरकारी नोकरदारांना उतार वयात पेन्शनची सुविधा उपलब्ध असते.
खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी देखील वेगवेगळ्या योजनेत पैसे गुंतवून ठेवलेले असतात. मात्र उतारवयात शेतकर्यांकडे कमाईचे कोणतेही साधन उरत नाही त्यामुळे त्यांचा उदहरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येतो. वृद्धापकाळात आर्थिक स्तरावर अनेक प्रकारच्या समस्या त्यांना सतावतात.
अशा परिस्थिती केंद्र सरकार शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे. देशातील अनेक शेतकरी या योजनेत सहभाग नोंदवत आहेत. या योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना वयाची ६० वर्षे कम्प्लिट झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये म्हणजे वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन मिळते.
निश्चितच उतार वयात या पैशांमुळे शेतकऱ्यांना आपला उदरनिर्वाह व्यवस्थित रित्या भागवणे शक्य होणार आहे. त्यामुळे शासन या योजनेत शेतकऱ्यांना अधिकाधिक सहभाग नोंदवण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान आज आपण या योजनेविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मात्र सुरुवातीला काही रक्कम जमा करावी लागणार आहे. जर एखादा शेतकरी वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत अर्ज करत असेल तर त्याला या योजनेत दरमहा 55 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच, अशा शेतकरी बांधवाला दररोज 1.83 रुपये जमा करावे लागणार आहेत.
म्हणजेच महिन्याकाठी 55 रुपये गुंतवणूक करून शेतकरी बांधव आपल्या वयाची साठ वर्षे कम्प्लीट झाल्यानंतर तीन हजार रुपये मासिक पेन्शन साठी पात्र ठरणार आहे. भारत सरकारच्या या योजनेत देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर अर्ज करत आहेत.
तुम्हालाही भारत सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच ज्यांच्याकडे २ हेक्टर किंवा त्याहून कमी जमीन आहे तेच प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतात.
तुमच्याकडे २ हेक्टरपेक्षा जास्त जमीन असल्यास. या परिस्थितीत तुम्ही प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, बँक पासबुक, शेतातील खसरा खतौनी, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यासारखी कागदपत्रे आवश्यक असतील.