Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा अशा महिला हिताच्या योजनेची माहिती देत असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने सुरू केलेल्या अशाच एका महिला हिताच्या योजनेची पंतप्रधान मोदी यांनी माहिती दिली होती.
ही योजना आहे लखपती दीदी योजना. केंद्राने सुरू केलेली ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये या योजनेचा देखील समावेश होतो. ही योजना महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
याचा महिलांना चांगला फायदा देखील होत आहे. मात्र अजूनही अनेकांना या योजनेची परिपूर्ण माहिती नाहीये. दरम्यान, आज आपण याच योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.
काय आहे लखपती दीदी योजना
या योजनेबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना महत्त्वाची घोषणा केली होती. त्यांनी या योजनेचा लाभ दोन कोटी महिलांऐवजी तीन कोटी महिलांपर्यंत पोहोचवण्याची मोठी घोषणा केली आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना बिनव्याजी कर्ज मिळते. या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. याशिवाय महिलांना या योजनेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण देखील दिले जाते.
ही योजना 15 ऑगस्ट 2023 पासून सुरू झाली आहे. आतापर्यंत या योजनेचा एक कोटी महिलांना लाभ झाला असून आता आणखी तीन कोटी महिलांना या योजनेचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे.
योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी एक लाखांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या कर्जाची विशेषता म्हणजे हे कर्ज बिनव्याजी राहते. या अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरवले जाते.
व्यवसायाच्या सुरुवातीपासून ते बाजारपेठेत पोहोचण्यापर्यंत या अंतर्गत व्यावसायिक महिलांना मार्गदर्शन दिले जाते. कमी खर्चात विमा सुविधा देखील उपलब्ध होते. याशिवाय महिलांना बचत करण्यासाठी देखील प्रोत्साहन दिले जाते.
कस मिळणार कर्ज
देशभरातील 18 ते 50 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात. संपूर्ण देशभरात ही योजना सुरू आहे, आपल्या महाराष्ट्रात देखील ही योजना राबवली जाते. मात्र यासाठी सदर महिला बचत गटाची सभासद असणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, बँक पासबुक व्यतिरिक्त, अर्जदाराने वैध मोबाइल नंबर आणि पासपोर्ट आकाराचे फोटो द्यावे लागतात. याअंतर्गत पात्र महिलांना कर्ज दिले जाते.