Government Onion Export : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या रविवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली कांदा निर्यातीसंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली होती.
या बैठकीत अमित शहा यांनी कांदा निर्यातीला शर्तीसह परवानगी दिली होती. मात्र याबाबतचा अधिकृत निर्णय जारी होण्यापूर्वीच ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी कांदा निर्यात बंदी ही 31 मार्च 2024 पर्यंत कायमच राहणार असे म्हटले.
देशांतर्गत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी निर्यात बंदी कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था पाहायला मिळत होती. मंत्री आणि अधिकारी यांच्यात तालमेल नसल्याचे स्पष्ट दिसत होते.
दरम्यान काल अर्थातच 22 फेब्रुवारी 2024 ला केंद्र सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
काही अटी आणि शर्तींसह कांदा निर्यात पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.
एवढा कांदा होणार निर्यात
काल ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी केंद्राने कांदा निर्यातीला परवानगी दिली असल्याची माहिती दिली. रोहित कुमार सिंग यांनी म्हटले की, भारतातील जवळपास 55 हजार टन कांदा निर्यात होणार आहे.
केंद्रानं कांदा निर्यातदारांना ५४,७६० टन कांदा बांगलादेश, मॉरिशस, बहारिन आणि भुटान या देशांमध्ये निर्यातीला परवानगी दिली असल्याचे त्यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया अर्थातच पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. PTI ने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर याबाबतची माहिती पोस्ट केली आहे.
केव्हापासून सुरु होती कांदा निर्यात बंदी
आठ डिसेंबर 2024 ला केंद्रशासनाने देशातील किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात राहव्या यासाठी कांदा निर्यात बंदीचा धोरणात्मक निर्णय घेतला. दरम्यान कांदा निर्यातून 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार होती.
मात्र या धोरणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. यामुळे कांदा निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती.
दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली आहे. मात्र, फक्त 55 हजार टन कांदाच निर्यात होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला काय भाव मिळतो? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.