Government Yojana : अर्थसंकल्प 2023 24 नुकताच सादर झाला आहे. शिंदे फडणवीस सरकारचा हा पहिला-वहिलाच अर्थसंकल्प होता. परिणामी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना विविध कल्याणकारी योजनांची घोषणा या बजेटमध्ये केली आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, कर्मचारी तसेच महिला यांना केंद्रस्थानी ठेवून यंदाचा बजेट घोषित करण्यात आला आहे. या बजेटमध्ये महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
मुलींसाठी लेक लाडकी योजना ही एक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत मुलींना जन्मापासून ते अठरा वर्षाच्या होईपर्यंत 98 हजाराचा लाभ मिळणार आहे. यासोबतच महिलांसाठी एसटी प्रवासात 50% सूट देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. म्हणजेच आता एसटी महामंडळाच्या बस मध्ये महिलांना अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
हे पण वाचा :- आता टाटा तयार करणार वंदे भारत ट्रेन ! येत्या 2 वर्षात धावणार तब्बल 200 वंदे भारत एक्सप्रेस, पहा रेल्वेच नियोजन
खरं पाहता योजनेची घोषणा अर्थसंकल्पात झाली मात्र याची अंमलबजावणी केव्हा होते याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. दरम्यान आता याच्या अंमलबजावणी बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये आता महिलांना अर्ध्या तिकिटावरील प्रवास एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे.
निश्चितच एप्रिल 2023 पासून या योजनेची अंमलबजावणी होणार असल्याने राज्यातील लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेमुळे महिलांना फायदा होईलच शिवाय एसटी महामंडळाला देखील नवसंजीवनी मिळणार आहे.
कारण की, या योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम देय राहणार आहे. साहजिकच यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भरी वाढ होईल आणि महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- 10वी पास तरुणांसाठी आयकर विभागात नोकरीची संधी ! ‘या’ पदावर सुरू झाली मोठी भरती
ज्येष्ठांना देखील मोफत प्रवास
जसं की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने राज्य शासनाच्या माध्यमातून 75 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या बसेसने मोफत प्रवास सुरु करण्यात आला आहे.
यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होत आहे शिवाय यामुळे एसटी महामंडळाचे देखील उत्पन्न वाढले आहे. निश्चितच आता ज्येष्ठांनां मोफत प्रवास राहणार आहे याव्यतिरिक्त राज्यातील सर्व महिलांना देखील आता एप्रिल महिन्यापासून अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शासनाच्या या दोन्ही निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हे पण वाचा :-म्हाडाच्या घर सोडतीसाठी अनामत रकमेत बदल; आता ‘इतकी’ अनामत रक्कम ‘या’ तारखेपर्यंत भरावी लागेल