Goat Rearing : भारतात फार पूर्वीपासून शेती सोबतच पशुपालनाचा व्यवसाय केला जातोय. अनेकजण गाय, म्हैस, शेळी, मेंढी अशा प्राण्यांचे संगोपन करतात. शेळीपालनाचा व्यवसाय ग्रामीण भागात सर्वाधिक होतो. शेतकरीच नाही तर ग्रामीण भागात राहणारे शेतमजूर देखील शेळीपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात.
शेळीपालनाचा व्यवसाय हा प्रामुख्याने मांस आणि दुग्ध उत्पादनासाठी केला जातो. यापासून लेंडीखत मिळते जें की शेती पिकांसाठी खूपच फायदेशीर ठरते. एकंदरीत शेळीपालनाचा व्यवसाय हा दुहेरी उद्देशाने केला जात आहे.
मात्र या व्यवसायातून जर चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर शेळीच्या सुधारित जातींचे संगोपन करणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत आज आपण शेळीच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आज आपण शेळीच्या ज्या सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत त्या शेळीच्या सुधारित जाती असून शेतकऱ्यांनी या जातीचे संगोपन केले तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.
शेळीच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
अँग्लोनुव्हियन : अँग्लोनुव्हियन ही एक विदेशी शेळी आहे. ही शेळीची एक सुधारित जात असून ही जात दुग्धोत्पादनासाठी विशेष ओळखले जाते. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपातील अनेक देशांमध्ये या जातीचे संगोपन केले जात आहे. ही जात मांस आणि दूध उत्पादनासाठी पाळली जाते. ही शेळीची विदेशी जात दररोज 3 ते 5 लिटर दूध देण्यास सक्षम आहे.
टोगेनबर्ग : ही शेळीची एक स्वित्झर्लंडची जात आहे. या शेळीला शिंगे नसतात हे विशेष. ही शेळी दररोज सरासरी 4 ते 4.5 लिटर दूध देण्यास सक्षम आहे. या जातीच्या शेळ्यांची मान लांब व पातळ असते. या जातीचे कान ताठ असतात.
शेळ्यांचे केस तपकिरी आणि पांढरे असतात हे विशेष. या जातींचे लेदर लवचिक आणि मऊ असते. पशुपालक या जातीच्या शेळ्या फक्त दूध उत्पादनासाठी पाळतात.
अल्पाइन : अल्पाइन ही सुद्धा शेळीची एक विदेशी जात आहे. ही जात मूळची स्वित्झर्लंडची आहे. ही जात प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी पाळली जाते. या जातीच्या शेळ्या दररोज ३ ते ४ लिटर दूध देत असल्याचा दावा काही तज्ञांनी केला आहे.
अल्पाइन शेळ्यांचे वजन सुमारे 61 किलो असते आणि त्यांची उंची सुमारे 76 सेमी असते. अल्पाइन शेळ्यांचा रंग पांढरा किंवा राखाडी ते तपकिरी आणि काळा असू शकतो. अल्पाइन शेळ्या भरपूर दूध देतात.
यामुळे या जातीच्या शेळ्यांचे प्रामुख्याने दुग्धोत्पादनासाठी पालन केले जाते. शेळीच्या दुधाला बाजारात चांगली मागणी असते आणि चांगला दरही मिळतो यामुळे अनेक जण या जातीच्या शेळीचे संगोपन करून लाखो रुपयांची कमाई करत आहेत.