Goat Rearing : शेळीपालन (Goat Farming) हा एक मुख्य शेती पूरक व्यवसाय (Agriculture Business) म्हणून ओळखला जातो. या व्यवसायात (Business) आपला भारत देश पहिल्या क्रमांकावर आहे. एका रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक शेळ्या आपल्या देशात आहेत.
असं सांगितलं जात की आपल्या देशात शेळ्यांच्या 50 पेक्षा जास्त जाती आढळतात. जमुनापारी, ब्लॅक बंगाल, सिरोही, तोतापरी, बीटल, बारबरी आणि उस्मानाबादी या शेळ्याच्या काही प्रमुख जाती आहेत. जाणकार लोक शेतकरी बांधवांना शेळी पालन करावयाचे असल्यास सुधारित जातींच्या (Goat Breed) शेळ्यांची निवड करण्याचा सल्ला देतात.
शेतकरी बांधवांनी (Farmer) शेळीपालन करताना आपल्या हवामानात तग धरू शकणाऱ्या शेळ्यांची जातीची निवड केली पाहिजे. जेणेकरून त्यांना शेळीपालन व्यवसायात तोटा सहन करावा लागणार नाही. मित्रांनो आज आपण जमनापुरी (Jamunapuri Goat Breed) या शेळीच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुठं आढळते जमुनापुरी शेळी
भारतात जमुनापारी शेळीपालन यमुना नदीच्या आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. या जातीचे मूळ ठिकाण उत्तर प्रदेशातील इटावा जिल्हा आहे. पण या शेळ्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणि पाकिस्तानमध्येही आढळतात. या जातीच्या शेळीपालनातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो कारण ही जात जास्त दूध आणि मांस देण्यासाठी ओळखली जाते.
जमनापुरी शेळीची ओळख
जमुनापारी शेळीच्या जाती पांढर्या, काळ्या, तपकिरी किंवा विविध मिश्र रंगाच्या असतात.
या शेळ्यांचे मागचे केस लांब आणि शिंगे लहान व टोकदार असतात.
या शेळ्या उंच असतात आणि त्यांना मोठे दुमडलेले कान असतात.
जमुनापारी जातीच्या शेळ्या इतर जातींच्या तुलनेत उंच आणि लांब असतात.
जमुनापरी शेळीची वैशिष्ट्ये
प्रौढ शेळीचे वजन 50 किलो ते 80 किलो दरम्यान असते.
तिच्या आयुष्यात 12 ते 14 करडाना जन्म देते.
ही शेळी दररोज 2 ते 3 लिटर दूध देते.
जमुनापरी शेळीचे दूध चवदार आणि चांगले असते.
जमुनापरी शेळीची किंमत तरी किती असते
जमुनापरी जातीच्या शेळ्या 1-2 वर्षात मांस देण्यास तयार होतात. या शेळ्यांना बाजारात खूप मागणी असते. जमुनापारी शेळीची किंमत 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत आहे. मात्र, शेळीची किंमत तिच्या आरोग्यावर आणि वजनावर अवलंबून असते. बाजारात 40 ते 50 किलोच्या बोकडाची किंमत 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत असते.