Goat Rearing : भारतात शेती बरोबरच (Farming) शेळीपालन (Goat Farming) शतकानुशतके केले जात आहे. शेळीपालन हा एक मुख्य शेती पूरक व्यवसाय (Agriculture Business) असून शेळीपालन करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो.
आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधव (Farmer) देखील मोठ्या प्रमाणात शेळीपालन करत आहेत. जाणकार लोकांच्या मते, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे. कारण यामध्ये गाई-म्हशीच्या तुलनेत खर्च कमी आणि नफा जास्त असतो. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, आपल्या भारतात शेळ्यांच्या एकूण 50 पेक्षा जास्त जाती आढळतात.
या जातीपैकी सुमारे 20 जातींचे व्यावसायिक स्तरावर संगोपन केले जाते. पशुपालन व्यवसायातील जाणकार लोक शेतकरी बांधवांना सुधारित जातीच्या शेळीचे पालन (Goat Breed) करण्याचा सल्ला देत असतात. अशा परिस्थितीत आज आपण शेळीच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
भारतातील शेळ्यांच्या काही प्रमुख जाती (Goat Rearing : Major Breed Of Goat)
जमुनापरी
बीटल
सिरोही
उस्मानाबादी
बरबरी
जमुनापुरी शेळीपालन :- जमुनापरी ही शेळीची एक प्रमुख जात आहे. या जातीचे संपूर्ण भारत वर्षात पालन केले जाते. शेळीची ही जात कमी चाऱ्यात जास्त दूध देते. या जातींचे संगोपन दूध आणि मांसासाठी केले जाते. दिवसाला दोन ते अडीच लिटर दूध देते. या जातीच्या एका शेळीची किंमत 10 ते 15 हजार असते.
बिटल शेळीपालन :- बीटलची जात दूध आणि मांसासाठी पाळली जाते. दिवसाला दोन ते अडीच लिटर दूध देते. प्रामुख्याने चारा खाण्यास प्राधान्य देतात. एका शेळीची किंमत 10 ते 15 हजार आहे.
सिरोही शेळीपालन :- शेळीची ही जात पशुपालक शेतकऱ्यांमध्ये मोठी लोकप्रिय आहे. या जातींचे पालन मुख्यता दूध आणि मांसासाठी केले जाते. सिरोही जातीचे संगोपन करून शेळी पालन करणारे शेतकरी चांगली कमाई (Farmer Income) करत आहेत. ही जात खूप वेगाने वाढते. या जातीच्या शेळीला धान्य खायला दिले जाते. दिवसाला एक ते दीड लिटर दूध देते.
उस्मानाबादी शेळीपालन :- ही जात महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाळली जाते. उस्मानाबाद जिल्हा या जातीच्या शेळीचे उगमस्थान म्हणून ओळखले जाते. यामुळे या शेळीला उस्मानाबादी असे म्हणून संबोधत असतात. उस्मानाबादी शेळीपालन केवळ मांसासाठीचं केले जाते कारण की या जातीची दूध देण्याची क्षमता इतर शेळ्यांच्या तुलनेत खूपच कमी असते. सर्व प्रकारचे अन्न खाते. एका शेळीची किंमत 12 ते 15 हजारांपर्यंत असते.
बरबरी शेळीपालन :- बारबारी शेळी मांस आणि दुधासाठी पाळली जाते. दिवसाला एक ते दीड लिटर दूध देते. या शेळीला सहज कुठेही नेले जाऊ शकते. एका शेळीची किंमत 10 ते 15 हजारांपर्यंत असते. या शेळीचे देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते.