Goat Rearing : भारतात गेल्या अनेक दशकांपासून मोठ्या प्रमाणात शेळी पालन (Goat Farming) केले जात आहे. शेळीपालन व्यवसाय (Agriculture Business) कमी खर्चात आणि कमी जागेत सुरू होत असल्याने या व्यवसायाकडे आता शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय करण्याचा सल्ला देतात.
खरं पाहता शेळी पालन व्यवसाय शेतकरी बांधवांना चांगला बक्कळ पैसा (Farmer Income) कमवून देणारा व्यवसाय आहे. मात्र असे असले तरी शेळीपालन व्यवसायात काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. यात प्रामुख्याने शेळीच्या जातींची (Goat Breed) निवड करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. जाणकार लोक सांगतात की शेतकरी बांधवांनी आपल्या भौगोलिक परिस्थितीचा तसेच हवामानाचा विचार करून शेळीच्या जातींची निवड केली पाहिजे.
आपल्या देशात तसेच आपल्या राज्यात देखील वेगवेगळ्या देशी तसेच विदेशी जातींच्या शेळ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात पालन होत आहे. आज आपण शेळीच्या अशा एका सुधारित जाती विषयी जाणून घेणार आहोत, जीं दिवसाला पाच लिटर दूध देण्यास सक्षम आहे. मित्रांनो आज आपण अल्पाईन या विदेशी शेळीच्या जाती विषय जाणून घेणार आहोत. ही जात विशेषत आपल्या दुग्ध उत्पादनासाठी शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.
भारतात अनेक विदेशी शेळ्यांच्या जातीचे पालन केले जाते. यामध्ये ‘अल्पाइन’ ही शेळीची जात देखील समाविष्ट आहे. ही प्रजाती मूळची स्वित्झर्लंड तसेच फ्रान्स देशाची असल्याचा दावा केला जात आहे. ही जात शेळीपालनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण की, या जातीची दूध देण्याची क्षमता ही खूप जास्त आहे. या शेळीच्या दुधात जवळपास चार ते पाच टक्के फॅट आढळत असल्याचा दावा केला जातो.
अशा परिस्थितीत या जातीच्या शेळ्यांचे पालन शेतकरी बांधवांना निश्चितच चांगला पैसा उपलब्ध करून देणार आहे. या जातीच्या नराचे (बोकड) वजन 65 ते 80 किलो ग्रॅम पर्यंत असू शकते असा दावा केला जातो मात्र मादी शेळीचे वजन हे बोकडपेक्षा कमी असते. मादी शेळीचे वजन 60 किलोग्राम पर्यंत असते. निश्चितच या जातीच्या शेळीचे पालन शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देणार आहे.