Goat Farming Loan : भारतात शेती (Farming) समवेतच शेळीपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. शेळीपालन (Goat Rearing) हे आजच्या काळात कमाईचे (Farmer Income) उत्तम साधन आहे.
या व्यवसायातुन अनेक शेतकरी बांधव (Farmer) आरामात लाखो रुपये छापत आहेत. जर तुम्हीही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर शेळीपालन व्यवसाय (Goat Farming Business) तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
10 शेळ्या पाळूनही हा व्यवसाय सुरू करता येतो. यासाठी सरकारकडून तुम्हाला आर्थिक मदतही दिली जाते. शिवाय आता देशातील अनेक बँका शेळी पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करत असून कर्ज उपलब्ध करून देत आहेत. शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकरी बांधवांना कर्ज दिले जाते. पशुपालक शेतकरी बांधव बँकेकडून कर्ज घेऊन शेळ्या खरेदी करू शकतात. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
10 शेळ्यांवर कर्ज मिळेल
जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 शेळ्यांवर बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जावे आणि शेळीपालन व्यवसायासाठी 10 शेळ्यांवर 400,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता. मिळालेल्या माहितीनुसार, शेळीपालनात कर्जाच्या रकमेवर वार्षिक 11.20 टक्के व्याजदर आहे. ही कर्जाची रक्कम तुम्ही तुमच्या जवळच्या फायनान्स कंपनी, सरकारी बँक, खाजगी बँक, स्मॉल फायनान्स बँक मधून देखील मिळवू शकता.
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड
रेशनकार्ड, वीज बिलाची छायाप्रत
शेळी फार्मचा प्रकल्प अहवाल
किमान 6 ते 9 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
पासपोर्ट आकाराचा फोटो इ.
शेळीपालन कर्जासाठी अर्ज कसा करावा
शेळीपालनावर कर्ज घेण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन शेळीपालन कर्जासाठी अर्ज करावा लागेल.
जिथे तुम्हाला तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे आणि गोट फार्मशी संबंधित माहिती प्रविष्ट करावी लागेल.
तुमच्या फॉर्मची पडताळणी केल्यानंतर, कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल.
शेळीपालनासाठी कर्ज घेताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही बँकेच्या अधिकाऱ्याशीही संपर्क साधू शकता. जिथे तुम्हाला या योजनेबद्दल आणि इतर सर्व माहिती सांगितली जाईल.