Goat Farming: शेळी पालन (Goat Rearing) हा शेतीशी (Farming) निगडित व्यवसाय आहे. यामुळे राज्यातील अनेक शेतकरी बांधव (Farmer) शेतीसोबतच शेळीपालन व्यवसाय करत आहेत. यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होत आहे.
जाणकार लोकांच्या मते शेळी पालन व्यवसाय फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे मात्र असे असले तरी पालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी शेळीच्या सुधारित जातींचे संगोपन करणे अतिशय आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर शेतकरी बांधवानी शेळीच्या सुधारित जातींचे (Goat Breed) संगोपन केले तर निश्चितच त्यांना फायदा होणारं आहे.
मित्रांनो आज आपण देखील शेळीच्या दोन सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण शेळीच्या दुंबा आणि उस्मानाबादी जातीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.
शेळीच्या सुधारित जाती:- दुम्बा शेळीची जात (Dumba Goat) :- जाणकार लोक शेतकरी बांधवांना आपल्या हवामानात ज्या शेळीच्या जाती तग धरतील त्या जातींचे संगोपन करण्याचा सल्ला देतात. यामुळे कोणत्याही जातीचे संगोपन करणे आधी तज्ञांचा सल्ला शेतकरी बांधवांना घ्यावा लागणारा आहे. दुम्बा ही शेळीची जात बहुधा उत्तर प्रदेश मध्ये आढळते.
बकरीदच्या काळात बाजारपेठेत त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या जातीचे करडे केवळ 2 महिन्यांत 30,000 पर्यंत विकले जाते, कारण त्याचे वजन 25 किलोपर्यंत बनते. मात्र 3 ते 4 महिन्यांनी त्यांची किंमत 70 ते 75 हजार रुपयांपर्यंत पोहोचते. निश्चितच या जातीच्या शेळीचे पालन शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा ठरणार आहे.
उस्मानाबादी शेळी (Osmanabadi Goat) :- मित्रांनो आपणास नावावरून अंदाज आला असेल की ही जात उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक आढळत असेल. मित्रांनो ही जात आपल्या महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने या जातीला असे नाव पडले आहे. ही जात खूपच कमी प्रमाणात दूध देते.
त्यामुळे या जातीच्या संगोपन विशेषता मांस उत्पादन मिळवण्यासाठी केले जाते. या जातीच्या प्रौढ नर शेळीचे वजन सुमारे 34 किलो आणि मादी शेळीचे वजन 32 किलोपर्यंत असते. निश्चितच ज्या शेतकरी बांधवांना मांस उत्पादनासाठी शेळी पालन करायचे आहे त्या शेतकरी बांधवांनी या जातीचे संगोपन केले पाहिजे. विशेष म्हणजे या शेळीला महाराष्ट्रातील हवामान मानवत असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी या जातीचे संगोपन फायद्याचे राहणार आहे.