Goat Farming : भारतात शेळीपालन (Goat Rearing) गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे. शेतकरी बांधव शेतीसोबतच शेळीपालन हा व्यवसाय (Agriculture Business) मोठ्या प्रमाणात करत असतात. खरं पाहता शेळीपालन व्यवसाय कमी खर्चात आणि कमी जागेत सुरू करता येत असल्याने आता बहुतांशी अल्पभूधारक शेतकरी बांधव (Farmer) शेळीपालन व्यवसायाकडे (Goat Farming Business) वळत असल्याचे चित्र आहे.
शेळीपालन व्यवसाय तुम्ही शेतकरी बांधवांना चांगली कमाई (Farmer Income) देखील होत आहे. मात्र असे असले तरी शेळीपालन व्यवसायात काही बाबींची खबरदारी देखील बाळगणे अपरिहार्य राहणार आहे. जाणकार लोकांच्या मते, शेळीपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी शेतकरी बांधवांनी शेळीच्या सुधारित जातींचे (Goat Breed) पालन केले पाहिजे. अशा परिस्थितीत आज आपण शेळींच्या काही विदेशी शेळींच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया शेळींच्या काही विदेशी जातींची माहिती.
भारतात पाळल्या जाणाऱ्या काही विदेशी जाती
भारतात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव देशी जातींच्या शेळ्यांचे पालन करत असतात. मात्र अलीकडे काळाच्या ओघात शेतीमध्ये तसेच शेळीपालन व्यवसायात देखील बदल होत आहे. आता शेळी पालन करणारे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात विदेशी जातींच्या शेळीचे पालन करत असल्याचे चित्र आहे. यामध्ये एल्पाइन, सानेन, न्यूबीयन या जातींचा समावेश होतो.
अल्पाइन: शेळीची ही एक विदेशी जात असून या जातीच्या शेळीचे जन्मस्थान फ्रान्स आहे. या जातीच्या शेळ्यांना पांढऱ्या ते काळ्या रंगाचे पांढरे ठिपके असलेले लहान टोकदार कान असतात. या जातीची शेळी एका दिवसात 0.9 ते 1.3 लिटर दूध देत असल्याचा दावा केला जातो. प्रौढ शेळीचे वजन 60 किलो पर्यंत असू शकते.
सानेन : शेळीची हे देखील एक प्रमुख विदेशी जात आहे. या जातींचे जन्मस्थान स्वित्झर्लंड आहे. या जातीचे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात पालन केले जात आहे. या जातीच्या शेळीचा रंग पांढरा असतो. नराला शिंगे असतात आणि मादी शिंगरहित असते. नाक सरळ असते, कान ताठ असतात, कान मात्र लांब आणि विकसित असतात. या जातीची शेळीपालन एका दिवसात 2.5-3 लिटर पर्यंत दूध देण्यास सक्षम आहे.
न्युबियन: या जातींच्या शेळीचे जन्मस्थान सुडान आहे. काळा ते गडद तपकिरी रंग आणि अंगावर पुरळ उठतात. दूध उत्पादन सुमारे 1 लिटर आहे.