Goa To Mumbai Railway News : सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरु आहेत. या दिवाळी सुट्टीत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान याचं अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाच्या माध्यमातून विशेष गाड्या सुरू केल्या जात आहेत.
कोकण रेल्वेने देखील दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. कोकण रेल्वेकडून गोवा ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आताची मोठी अपडेट समोर येत आहे.
खरे तर गोवाहून मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनी आहे. कोकणातील हजारो प्रवासी दररोज मुंबईला येत असतात. सणासुदीच्या दिवसांमध्ये ही संख्या वाढत असते.
दिवाळीच्या काळात तर कोकणातून मुंबईला येणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय असते. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे कडून कोकणातील प्रवाशांसाठी गोवा ते मुंबई दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे.
कोकण रेल्वे १ नोव्हेंबरला गोव्यावरून थेट मुंबईसाठी एकमार्गी विशेष गाडी चालवणार अशी माहिती रेल्वे प्रशासनाने आहे. अशा परिस्थितीत आता आपण गोव्यावरून थेट मुंबईसाठी धावणाऱ्या या एकमार्गी विशेष गाडीचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी मडगाव जंक्शन ते मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे स्थानकादरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी उद्या एक नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता मडगाव जंक्शन येथून सकाळी ८ वाजता सोडली जाणार आहे.
तर त्याच दिवशी सायंकाळी ७:२० मिनिटांनी ती मुंबई सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल. या गाडीत व्हिस्टा डोमसह एकूण १६ कोच असणार आहे.
ही गाडी कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे.