Gilke Lagwad : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत मोठा बदल केला आहे. पारंपारिक पिकांसोबतच आता शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात भाजीपाला वर्गीय पिकांची देखील लागवड करू लागले आहेत. या पिकांमध्ये टोमॅटो, बटाटे, कारली, गिलके, भेंडी, वांगी, मिरची, कोबी, फ्लॉवर इत्यादी भाजीपाला अर्थातच तरकारी पिकांचा समावेश होतो.
खरेतर, सध्या स्थितीला रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. रब्बी हंगामातील हरभऱ्याची काही ठिकाणी हार्वेस्टिंग देखील सुरू झाली असावी.
तर काही ठिकाणी हरभऱ्याचे पिक अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसात या पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत, उन्हाळ्यात काही शेतकरी बांधव भाजीपाला पिकांची शेती सुरू करणार आहेत.
दरम्यान, जर तुम्हीही भाजीपाला लागवड करण्याच्या तयारीत असाल आणि गिलक्याची लागवड करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे.
कारण की, आज आपण उन्हाळ्यात लागवड केल्या जाऊ शकणाऱ्या गिलक्याच्या काही सर्वोत्तम जातीची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
पल्लवी : महिको कंपनीचा पल्लवी हा गिलक्याचा एक सुधारित वाण आहे. या जातीचे गिलके अवघ्या 45 ते 50 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होतात.
काही ठिकाणी तर चाळीस दिवसात देखील या जातीचे पीक परिपक्व झाल्याचे आढळून आले आहे. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. राज्यातील अनेक शेतकरी बांधव या जातीच्या गिलक्याची लागवड करत आहेत.
नामधारी एन एस 474 : गिलक्याचा हा देखील एक सुधारित वाण आहे. या जातीचे गिलके लागवड केल्यानंतर साधारणतः 40 ते 45 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होऊ शकतात अशी माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे.
या जातीचे गिलके गडद हिरव्या रंगाचे असतात. चवीला उत्कृष्ट असणारे हे गिलके बाजारात खूपच मागणीत आहेत. त्यामुळे या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
व्हीएनआर (आरती) : जर तुम्ही ही गिलक्याची लागवड करू इच्छित असाल तर या जातीच्या गिलक्याची लागवड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या जातीचे पीक काढण्यासाठी थोडेसे उशिरा तयार होते. मिळालेल्या माहितीनुसार या जातीची लागवड झाल्यानंतर सरासरी 50 ते 55 दिवसात या जातीचे पीक हार्वेस्टिंगसाठी तयार होऊ शकते.