Gharkul Yojana : आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. खरंतर राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या कौतुकास्पद योजना चालवल्या जात आहेत. यामध्ये राज्यातील ज्या नागरिकांना राहण्यासाठी हक्काचे घर नाही कच्चे घर आहे अशा लोकांसाठी घरकुल योजना देखील राबवली जात आहे.
खरे तर स्वातंत्र्याच्या जवळपास आठ दशकांच्या या काळात राज्यात असेही अनेक लोक आहेत ज्यांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर नाही.
परिणामी, या अशा लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने वेगवेगळ्या घरकुल योजना सुरू केल्या आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांसाठी रमाई आवास योजना, अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकांसाठी शबरी आवास योजना तसेच ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना नमो आवास योजना यांसारख्या योजना राबवल्या जात आहेत.
एवढेच नाही तर केंद्राच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना देखील राबवली जात आहे. याशिवाय भटक्या विमुक्त जाती-जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना राबवली जात आहे.
तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना देखील राबवली जात आहे. दरम्यान पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य मंत्रिमंडळाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला नाही.
खरेतर ही योजना ज्या घरकुल लाभार्थ्यांना स्वतःची जागा नाही अशा भूमिहीन लाभार्थ्यांसाठी उपयोगाची आहे. या योजनेअंतर्गत भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवले जात आहे.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना 50 हजार रुपये एवढे अर्थसहाय्य दिले जात होते. मात्र या अर्थसाह्यात आता आणखी 50 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
म्हणजेच या लाभार्थ्यांना आता एक लाख रुपये एवढी रक्कम घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदी करणे हेतू उपलब्ध होणार आहे. परिणामी राज्य शासनाच्या या निर्णयाचे अनेकांनी तोंडभरून कौतुक केले आहे.
या निर्णयामुळे ज्या भूमीहीन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा नसते अशा भूमिहीन लाभार्थ्यांना देखील घर बांधता येणे शक्य होणार आहे.