Gay Gotha Anudan Maharashtra : राज्यात शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शेती व्यवसायाच्या अगदी सुरुवातीपासूनच शेतीशी निगडित हा व्यवसाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवत आहे. तथापि या व्यवसायातुन जर चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर जनावरांचे आरोग्य अबाधित ठेवणे आवश्यक असते.
यासाठी जनावरांसाठी गोठा असणे आवश्यक आहे. दरम्यान सर्वच पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांसाठी गोठा तयार करता येत नाही. गोठा तयार करण्यासाठी लागणारे भांडवल शेतकऱ्यांकडे नसते आणि यामुळे त्यांची जनावरे उघड्यावरच असतात.
हेच कारण आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन गाय गोठा अनुदान योजना राबवली जात आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनावरांसाठी गाय गोठा अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गोठा बनवण्यासाठी अनुदान पुरवले जात आहे. आता आपण या योजनेसाठी आवश्यक असलेल्या पात्रता कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणते शेतकरी राहणार पात्र ?
महाराष्ट्रातील रहिवासी पशुपालक शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील.
ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन आहे असेच शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत.
या अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी स्वातंत्र अर्ज करावा लागणार आहे.
या योजनेचा लाभ राज्यातील फक्त ग्रामीण भागातील नागरिकांना घेता येणार आहे.
आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी कुटुंबाला याचा लाभ मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन आहे अर्थातच गाई, म्हैस यांसारखे जनावरे आहेत त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी गाय गोठा अनुदानासाठी आधी अनुदान घेतलेले असेल त्यांना या अंतर्गत अनुदान मिळणार नाही.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, मतदार कार्ड, मोबाईल क्रमांक, वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक राहणार आहेत. याशिवाय ज्या जागेवर गोठा बांधला जाणार आहे ती जागा जर सहभागीदारात असेल तर समती पत्र लागणार आहे.
ग्रामपंचायतचे शिफारस पत्र, अल्पभूधारक शेतकरी असल्याचा दाखला, पशुधन उपलब्धता प्रमाणपत्र, मनरेगा ओळखपत्र आणि जॉब कार्ड लागणार आहे. शिवाय, गोठा बांधण्यासाठी किती खर्च येईल याबाबतची माहिती देखील द्यावी लागणार आहे.
अर्ज कुठं करणार
https://drive.google.com/file/d/1k7EsDLjSRP5–gvBJ2nxfEgLLXZt1CmP/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन शेतकऱ्यांना गाय गोठा अनुदानाचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल. हा अर्ज शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक भरायचा आहे. यामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरून झाल्यानंतर हा अर्ज शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीत जमा करावा लागणार आहे.