Garlic Farming: भारतात मोठ्या प्रमाणात कंदवर्गीय पिकांची शेती (Farming) केली जाते. लसणाचे पीक देखील कंदवर्गीय पीक म्हणून ओळखले जाते. खरं पाहता लसणाचं पीक हे नगदी पीक (Cash Crop) आहे, यामुळे याची शेती आपल्या देशात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते.
विशेष म्हणजे लसणाची शेती शेतकऱ्यांना (Farmer) विशेष फायद्याची ठरत असून त्यांना लाखो रुपयांची कमाई (Farmer Income) होत आहे. लसणाची (Garlic) गणना सर्वात फायदेशीर पिकांमध्ये केली जाते. हे अनेक उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाते.
याशिवाय लसणाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे लसणाला बारामाही बाजारपेठ उपलब्ध असते. परिणामी शेतकरी बांधवांना याच्या शेतीतून अधिक उत्पन्न मिळत असते. भारतात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर याची लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील लसणाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे.
या जमिनीवर लसणाची लागवड करावी
लसणाच्या लागवडीसाठी चिकणमाती असलेली शेतीजमीन सर्वात योग्य असल्याचे कृषी तज्ञ सांगत असतात. याची लागवड करण्यापूर्वी शेतात ओलावा आहे की नाही हे तपासावे लागते. ओलावा नसल्यास शेतात एकदा पाणी भरावे, जेणेकरून जमिनीला योग्य ओलावा मिळेल.
यानंतर, सपाट बेड तयार करून लसूण रोपाची पुनर्लावणी सुरू करावी असा सल्ला दिला जातो. यादरम्यान, शेतात पाण्याचा चांगला निचरा करण्याची व्यवस्था ठेवणे देखील आवश्यक असल्याचे सांगितले जाते. याशिवाय या पिकाला वेळोवेळी पाणी देत रहावे लागणार आहे.
लसणाची काढणी केव्हा करावी
लसूण केव्हा काढणी करायचा हे आपण त्याच्या पानांवरून शोधू शकता. जेव्हा पाने पिवळी पडू लागतात आणि गळू लागतात तेव्हा लसूण काढणी करायला सुरुवात करावी असा सल्ला दिला जातो. काढणी पूर्ण झाल्यानंतर, आपण लसूण अशा ठिकाणी ठेवावे जेथे सूर्यप्रकाश नसेल. त्यानंतर, कंदांपासून पाने विभक्त करण्याच्या प्रक्रिया करावी लागते.
लसूण लागवडीतून बंपर कमाई
जर आपण एक बिघा जमिनीवर लसणाची लागवड केली तर आपण 7-8 क्विंटल लसूण उत्पादन घेऊ शकता. मंडईत लसणाच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. सरासरी, त्याची किंमत 100-120 रुपये राहते. मंडईतील लसणाचे भाव योग्य राखले तर शेतकऱ्याला एक बिघा शेतीतही लाखोंचा नफा आरामात मिळू शकतो. निश्चितच लसणाची लागवड शेतकऱ्यांना लखपती बनवून सोडणार आहे.
शेतकरी बांधवांनी जर दोन-तीन बिघा जमिनीत लसणाची शेती केली तर निश्चितच शेतकरी बांधवांना दीड ते दोन लाख रुपये नफा राहू शकतो. अशा तऱ्हेने शेतकरी बांधव अधिक शेतजमिनीवर याची लागवड करून काही वेळेतच लाखों रुपयांची कमाई करू शकणार आहेत.