Garlic Farming : आपल्या महाराष्ट्र राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असून कांदा उत्पादनासाठी महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय आपल्या राज्यात विविध पिकांची शेती केली जाते. लसूण (Garlic Crop) देखील असंच एक पीक असून याची देखील आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते.
आपल्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत लसूण लागवड (Cultivation Of Garlic) केली जात आहे. पांढर्या जामनगर जातीबरोबरच गोदावरी आणि श्रेता या जातींची आपल्या राज्यात प्रामुख्याने लागवड केली जात आहे. खरं तर, लसणाच्या शेतीसाठी, अधिक उष्ण किंवा अधिक थंड हवामानाची गरज नसते. अशा स्थितीत ऑक्टोबर महिना हा लसूण लागवडीसाठी योग्य मानला जातो.
या ऋतूत लसणाची कंद निर्मिती चांगली होते. चिकणमाती जमीन त्याच्या लागवडीसाठी चांगली असते. लसणात प्रोपिल डायसल्फाइड आणि लिपिड मोठ्या असतात. लसणाचा वापर चटण्या, भाज्या आणि लोणच्यामध्ये केला जातो.
यात पोटाचे आजार, अपचन, कानदुखी, डोळ्यांचे विकार, डांग्या खोकला इत्यादींवर उपचार करण्याचे गुणधर्म आहेत. यामुळे लसणाला बारामाही मागणी असते, शिवाय बाजार भाव (Garlic rate) देखील चांगला मिळतो. अशा परिस्थितीत या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे.
लसणाच्या लागवडीसाठी उपयुक्त हवामान आणि जमीन नेमकी कोणती बर…!
महाराष्ट्र कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लसणाच्या लागवडीसाठी समशीतोष्ण हवामान अनुकूल असते. मात्र, अतिशय उष्ण आणि अतिशय थंड हवामान या पिकासाठी अनुकूल नाही. समुद्रसपाटीपासून 1000 ते 1300 मीटर उंचीवर लसणाची लागवड करता येते.
जाणकार लोकांच्या मते पावसाचे प्रमाण 75 सें.मी.पेक्षा जास्त असल्यास पिकांची वाढ चांगली होत नाही. हेच कारण आहे की, ऑक्टोबर महिन्यात त्याची लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. चिकणमाती असलेल्या मध्यम खोलीच्या जमिनीत सेंद्रिय खत मिसळून पीक चांगले घेता येते. हलकी माती, चिकणमाती असलेली जमीन त्याच्या लागवडीसाठी योग्य नाही.
लसूण पिकासाठी आवश्यक सिंचन
लसूण लागवडीनंतर लगेच पहिल्यांदा पाणी द्यावे पाणी भरताना काळजी घेतली पाहिजे. लसूण पिकाला पहिल्यांदा पाणी हळूहळू द्यावे. त्यानंतर 3-4 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे आणि हंगामानुसार पुढील 8 ते 12 दिवस पाणी दिले पाहिजे. लसूण काढणीच्या दोन दिवस आधी पाणी द्यावे. यानंतर पाणी देऊ नये. म्हणजे लसूण काढणे सोपे जाते व लसूण पिकाची हानी होत नाहीत.
लसूण काढणी आणि उत्पादन नेमकं किती मिळणार बर..!
पेरणीनंतर साडेचार ते पाच महिन्यांनी हे पीक काढणीस योग्य आहे. जेव्हा लसूण पीक पिवळे होते याचा अर्थ ते काढण्यासाठी तयार आहे. लसणाची पाने अशा प्रकारे बांधली पाहिजेत जेणेकरून ते 8-10 महिने टिकेल. विक्रीसाठी नेताना पाने कापून स्वच्छ करून आकारानुसार वर्गीकरण करून बाजारात पाठवली जातात. लसणाचे उत्पादन जमिनीचा पोत, खत आणि विविधता यावर अवलंबून असते. उत्पादन 9 ते 10 टन प्रति हेक्टर मिळत असल्याचा दावा केला जातो.