Ganesh Chaturthi Kanda Rate : आज गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणेशोत्सव साजरा होणार आहे. दरम्यान आज आपण गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजार भाव तेजीत आले आहेत. मात्र नाफेड चा बफर स्टॉक मधील कांदा आता खुल्या बाजारात उतरवण्यात आला आहे. यामुळे देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढेल आणि बाजार भाव घसरतील अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.
यामुळे अनेकांच्या माध्यमातून सध्या राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळतोय याविषयी विचारणा केली जात आहे. अशा परिस्थितीत आता आपण राज्यातील प्रमुख बाजारांमधील बाजार भाव अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कांद्याला काय दर मिळाला
नेवासा घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 4300 आणि सरासरी 3500 रुपये असा भाव मिळाला आहे.
कोपरगाव शिरसगाव तिळवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1500, कमाल 4176 आणि सरासरी 3940 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1100, कमाल चार हजार एकवीस आणि सरासरी 3800 असा भाव मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 500, कमाल चार हजार तीनशे आणि सरासरी 3600 असा भाव मिळाला आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान पंधराशे, कमाल 4300 अन सरासरी तीन हजार सहाशे असा भाव मिळाला आहे.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1500, कमाल 4000 आणि सरासरी 2750 असा भाव मिळाला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 2000, कमाल 3800 आणि सरासरी 2900 असा भाव मिळाला आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती : पुणे जिल्ह्यातील या बाजारात कांद्याला किमान एक हजार, कमाल 4,400 आणि सरासरी 3400 असा भाव मिळाला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये कांद्याला किमान 3000, कमाल 4500 आणि सरासरी 3800 असा भाव मिळाला आहे.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात एक नंबर कांद्याला किमान 3400, कमाल 4400 आणि सरासरी 3750 असा दर मिळाला आहे. तसेच दोन नंबर कांद्याला किमान 2400, कमाल 3300 आणि सरासरी 2650 अन तीन नंबर कांद्याला किमान 1000, कमाल 2300 आणि सरासरी 1350 असा भाव मिळाला आहे.