मध्यंतरी झालेल्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे भारत सरकारने गहू, मैदा निर्यातीचे जे धोरण अवलंबले होते, त्यामुळे बराचसा माल हा निर्यातीला गेला व सध्या राहिलेला माल हा अत्यंत कमी प्रमाणात आहे.
मालाच्या आवकेचे प्रमाण आहे. उत्पादन क्षेत्रात मालाच्या आवकेचे प्रमाण कमी झाल्यामुळे भाव मध्ये साधारणपणे ३०० ते ४०० रुपये इतकी वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारात दर्जानुसार ३५ते ६० रुपये प्रति किलोस भाव मिळत आहे त्यामुळे सामान्यांचे आथिर्क बजेटच कोलमडले असून त्यांनी कसे जगायचे , असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .
सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले
शासन दर वर्षी आधारभूत किंमत वाढविते व त्याच वेळी सरकार आधारभूत किमतीमध्ये माल खरेदी करून ठेवते. सद्यःस्थितीत शासनाने साठा केलेला माल जर खुल्या बाजारात विक्रीस काढला तर पुढील दोन महिने भाव स्थिर होण्यास मदत होईल मध्य प्रदेश,
गुजरात येथून गव्हाची सवंर्धिक आवक होते .अतिप्रमाणात झालेला पाऊस सध्या थंबला आहे .त्यामुळे गव्हाची पेरणी एक महिना उशिरा का होईना सुरु झाली आहे . सद्यःस्थितीत चांगली प्रतीचा गहू खुप कमी प्रमाणात आहे.
गेल्या काही दिवसांपासून गव्हाच्या चांगल्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मिलवाल्यांनाही पुरेसा माल उपलब्ध होत आहे, त्यास अटकाव होण्यास
सद्यःस्थितीत गव्हाच्या भावात विक्रमी वाढ झाली असून आगामी काळात भाव तेजी तच राहतील. श्याम लढ्ढा
गव्हचा प्रकार आगस्ट 2022 नोव्हेंबर 2022
लोकवन | २८००-३२०० |३३००-३८००
सिहोरी । २९००-३२०० | ३३००-३८००
एम.पी. सिहोर | ४५००-५००० | ५१००-५६००
दिवाळीनंतर गव्हामध्ये प्रति क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. शासनाने मिलवाल्यांना खुल्या बाजारात गहू न दिल्यामुळे व दिवाळीचा हंगाम असल्यामुळे मिलवाल्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. घरगुती ग्राहकांची मागणी असल्यामुळे गव्हाच्या भावात वाढ झाली आहे.
७७ सद्यःस्थितीत गव्हाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवीन गहू फेब्रुवारी महिन्यात येणार आहे. सद्यःस्थितीत बाजारात मालवराज गहू हा आला आहे. या गव्हामुळे इतर प्रकारचे गहूवाढीला काहीसा प्रतिबंध होत आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात झाली होती. तसेच दिवाळीपूर्वीही ग्राहकांकडून खरेदी झाली. सद्यःस्थितीत मिलवाल्यांकडूनही पुन्हा खरेदी सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज गव्हाच्या भावात वाढ होत आहे. यंदा गहू महागच राहणार आहे.
गव्हाच्या वाढीमुळे गोरगरिबांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. गहू हा जीवनावश्यक असल्यामुळे सामान्यांना खरेदी करावा लागत आहे. मात्र, तो खरेदी करताना हात आखडता घेतला जात आहे. परिणामी, भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शासनाने गोरगरिबांसाठी सर्वकष धोरण आखावे.