Flower Farming : भारतात गेल्या अनेक दशकांपासून तेलबिया पिकांची (Oilseed Crop) शेती केली जात आहे. सोयाबीन, सूर्यफूल, तीळ यांसारख्या अनेक तेलबिया पिकांची लागवड भारतात प्रामुख्याने केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील तेलबिया पिकांची शेती (Farming) विशेष उल्लेखणीय आहे.
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विभागात तेलबिया पिकांची लागवड केली जाते. सूर्यफूल (Sunflower Crop) हे देखील असच एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाची संपूर्ण भारत वर्षात कमी अधिक प्रमाणात शेती बघायला मिळते. मित्रांनो सूर्यफूल शेती (Sunflower Farming) शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याची ठरत आहे.
या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे पेरणी केल्यापासून शेतकरी बांधवांना (Farmer) अवघ्या नव्वद दिवसात या पिकातून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. यामुळे अलीकडे सूर्यफूल शेतीकडे शेतकरी बांधव अधिक वळत असल्याचे चित्र आहे. आज आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी सूर्यफूल शेती मधील काही महत्त्वाच्या बाबी घेऊन हजर झालो आहोत.
सूर्यफुलाची लागवड कशी करावी बर
सूर्यफुलाच्या लागवडीतून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी वालुकामय व हलक्या चिकणमाती असलेल्या जमिनीत याची लागवड करावी. याशिवाय सूर्यफूल च्या पिकातून चांगले उत्पादन मिळावे या अनुषंगाने मधमाशीपालनही करावे.
यामुळे तुम्हाला दोन फायदे होतील. एक तर तुमचे सुर्यफूल पिकाचे उत्पादन वाढेल आणि त्याच बरोबर मधमाशी पालनाचा व्यवसाय करून म्हणजे मध उत्पादन करून आणि बाजारात विकून तुम्ही अतिरिक्त नफा मिळवू शकता.
शेतकऱ्यांनी कुजलेले शेणखत, गांडूळ, कंपोस्ट खतही शेतात टाकावे जेणेकरुन सूर्यफूल पिकाच्या वाढीत कोणतीही अडचण येणार नाही. यामुळे उत्पादनात देखील वाढ होईल.
जाणकार लोकांच्या मते सूर्यफूल शेतीतून चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी याच्या संकरित व सुधारित वाणांची लागवड केली पाहिजे.
लक्षात ठेवा की जंगली जनावरे सूर्यफूल पिकाचे खूप नुकसान करतात, म्हणून पिकाच्या संरक्षणासाठी, शेतात योग्य त्या उपाय-योजना शेतकरी बांधवांना कराव्या लागणार आहेत.
सूर्यफूल पिकाची काढणी नेमकी केव्हा
सूर्यफूलाचे पीक 90 ते 100 दिवसात तयार होते, परंतु शेतकऱ्यांनी पिकाची सर्व पाने कोरडी झाल्यावर आणि फुलांच्या डोक्याचा मागील भाग लिंबू पिवळा झाल्यावर सूर्यफुलाची काढणी करावी.
सूर्यफूल शेतीसाठी खर्च आणि नफा
सूर्यफुलाच्या लागवडीत खर्च कमी आणि जास्तीत जास्त नफा मिळतो. एक हेक्टरमध्ये त्याची लागवड केल्यास एकूण खर्च सुमारे 25 ते 30 हजार रुपये येतो. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 हेक्टरमधून सुमारे 25 क्विंटल सूर्यफूलाचे फुल मिळतात.
ज्याची किंमत भारतीय बाजारपेठेत प्रति क्विंटल सुमारे 4 हजार रुपये आहे. अशा परिस्थितीत हिशेब केला तर त्याच्या लागवडीतून लाखो रुपयांचा नफा सहज मिळू शकतो. म्हणजेच हजारो खर्च करून लाखोचा नफा शेतकऱ्यांना या पिकाच्या शेतीतून मिळणार आहे.