Flower Farming : भारत हा कृषिप्रधान देश आहे. यासोबतच आपला देश हा सण आणि उत्सवाचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात बारा महिने सण किंवा उत्सव असतात. अशा परिस्थितीत देशात फुलांची (Flower Crop) देखील मोठी मागणी असते.
प्रत्येक तीज-उत्सवात, कोणत्याही लग्नात किंवा इतर समारंभात, आपल्याला सजावटीत झेंडूची (Marigold Crop) फुले नक्कीच दिसतील. अशा परिस्थितीत झेंडूची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात असून त्याला चांगला बाजार भाव (Marigold Rate) देखील मिळतो.
विशेषत: दसरा आणि दिवाळीच्या दिवशी या फुलांची मागणी खूप वाढते. यामुळे दसरा आणि दिवाळीच्या काळात कर यांनी लागवड केलेल्या झेंडूची फुले जर काढणीसाठी आले तर निश्चितच शेतकरी बांधवांना (Farmer) यातून लाखोंची कमाई (Farmer Income) होणार आहे.
झेंडूची फुले अनेक रंगात वाढतात. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, झेंडू लागवडीसाठी फारसा खर्च येत नाही आणि ते कमी वेळेत काढणीसाठी तयार होत असते. शिवाय झेंडूच्या फुलांना बाजारात सणासुदीच्या काळात चांगली किंमत
देखील असते. यामुळे झेंडूची लागवड (Marigold Farming) शेतकऱ्यांना कमी दिवसात आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवून देत असल्याचे जाणकार नमूद करतात.
झेंडूच्या फुलांचे प्रकार आधी जाणून घ्या
आपल्या माहितीसाठी या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो की, झेंडूच्या फुलांचे 2 प्रकार आहेत. एक फ्रेंच झेंडू आहे, ज्याची झाडे खूपच लहान आहेत. त्यांचे फूलही अगदी लहान वाढते. दुसरा आहे आफ्रिकन झेंडू त्यांची फुले खूप दाट आणि मोठी असतात.
झेंडूची शेती कोणत्याही हंगामात करता येते बर
कृषी तज्ञांच्या मते, शेतकरी बांधवांनी कोरड्या जागी झेंडूच्या फुलांची लागवड उन्हाळी हंगामात केली पाहिजे. यामुळे त्यांना झेंडूच्या शेतीतून सर्वाधिक उत्पन्न मिळत असते. या फुलाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची लागवड तीनही हंगामात करता येते. कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, झेंडूच्या शेतीसाठी तापमान सुमारे 15 ते 29 डिग्री सेल्सियस असावे.
यापेक्षा जास्त असल्यास झाडांचे नुकसान होऊ शकते. बाकीच्या फुलशेतीच्या तुलनेत झेंडूच्या फुलाची लागवड केल्यास खर्च खूपच कमी येतो आणि ते विकण्यासाठी शेतकऱ्याला फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. कृषी तज्ञ सांगतात की, शेतकरी बांधवांनी जर 25 ते 30 हजार रुपये खर्चून झेंडूच्या फुलांची लागवड केली तर त्यांना जवळपास दोन ते तीन लाखांचा नफा या पिकातून सहज राहणार आहे. मात्र यासाठी शेतकरी बांधवांना सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलांचे उत्पादन काढणीसाठी तयार करावे लागणार आहे.