Flower Farming: मित्रांनो भारत हा उत्सवाचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात बारामाही कोणता ना कोणता उत्सव असतोच. उत्सव किंवा सणासुदीचा हंगाम येत्या काही दिवसात आपल्या देशात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक भागात आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.
विशेषत: या हंगामात शेतकरी (Farmer) फुलांची विक्री करून चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळविण्यासाठी विविध प्रकारच्या फुलांची लागवड करत आहेत. झेंडू, गुलाब, हिबिस्कस, चंपा, कमळ या फुलांची (Floriculture) शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत. मात्र असे असले तरी या फुलांना बाजारपेठ फारच मर्यादित आहे.
मात्र रजनीगंधाची फुले (Rajanigandha Flower) बाजारात बारामाही मागणीत असतात. सणासुदीच्या दिवसात मागणी मध्ये अजूनच वाढ होते. अशा परिस्थितीत रजनीगंधा फुलांची शेती (Rajanigandha Flower Farming) शेतकऱ्यांना बक्कळ पैसा कमवून (Farmer Income) देणारी ठरणार आहे. त्यामुळे आज आपण रजनीगंधा फुलाच्या शेती विषयी जाणून घेणार आहोत.
हे केवळ ग्रंथ-पूजेतच नाही तर अगरबत्ती, पुष्पगुच्छ, हार, अत्तर, साबण, उटणे आणि अगदी हर्बल उत्पादने आणि औषधांच्या स्वरूपात देखील वापरले जाते. या फुलांना बाजारात नेहमीच मागणी असते, त्यामुळे त्यांची लागवड करणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते.
या राज्यांमध्ये रजनीगंधा लागवड करता येते बर…!
भारतातील अनेक राज्यांमध्ये रजनीगंधाची व्यावसायिक लागवड केली जात आहे. जाणकार लोकांच्या मते या फुलाच्या शेतीसाठी भारतातील हवामान अतिशय अनुकूल आहे. विशेषत: पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचे हवामान या शेतीसाठी अधिक फायदेशीर असून या राज्यात रजनीगंधा शेती मोठ्या प्रमाणात केली देखील जात आहे.
जाणकार लोकांच्या मते, या फुलाची लागवड करण्यापूर्वी, माती आणि योग्य हवामानाची माहिती असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, डोंगराळ भागात जून ते जुलै या कालावधीत याची लागवड केली जाते, परंतु मैदानी भागात सप्टेंबर महिन्यात लागवड केली जाते.
त्याच्या पिकातून सुगंधी फुलांचे उत्पादन घेण्यासाठी मोकळी जागा आणि सूर्यप्रकाश अत्यंत आवश्यक आहे.
त्याची देखभाल आणि सिंचनावरही फारसा खर्च येत नाही. 10 ते 12 दिवसांच्या दरम्यान सिंचन आणि महिन्यातून एकदा तण काढणे आणि निंदणी केली जाते.
तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही दुप्पट कमाईसाठी रजनीगंधा शेतीसोबत मधमाशीपालन युनिट देखील स्थापन करू शकता, ज्यामध्ये फुलांसोबतच चवदार मधही मिळेल.
1 लाख खर्च करा 5 लाख कमवा, कसं ते जाणून घ्या बर…!
रजनीगंधा पिकाची लागवड त्याच्या कंदापासून म्हणजेच मुळांपासून केली जाते. या पद्धतीने लागवड केल्यास शेतकरी बांधवांना फुलांचे पूर्ण उत्पादन 3 ते 5 महिन्यांत मिळते. कंद लागवडीसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुमारे 1 ते 2 लाख रुपये खर्च केले जातात. ज्यामध्ये प्रति हेक्टरी सुमारे 90 ते 100 क्विंटल फुलांचे उत्पादन होते. एकदा कापणी केल्यावर, फुले खूप वेगाने वाढतात, जी विकून वर्षभरात 4 ते 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवता येतो.