Flower Farming : भारतात शेतकरी बांधव (Farmer) पारंपारिक पिकासमवेतच (Traditional Crops) मोठ्या प्रमाणात फुल शेती (Floriculture) करत असतात. शेती कमी खर्चात सुरू करता येत असल्याने शेतकऱ्यांना यातून चांगला फायदा (Farmer Income) देखील होत आहे.
मित्रांनो पळस (Palash Crop) हे देखील असेच एक फूल पीक आहे. पळसाची लागवड (Palash Farming) उत्तर प्रदेश या राज्यात सर्वाधिक बघायला मिळते. आपल्या राज्यात देखील पळस हे फुलझाड नजरेस पडत असते. मात्र या फुलाची व्यावसायिक लागवड आपल्या राज्यात कुठेही आढळत नाही.
मात्र असे असले तरी काही शेतकरी बांधवांनी प्रायोगिक तत्त्वावर या पिकाची शेती सुरू केली आहे. खरं पाहता हे फुल त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. होळीचे रंग बनवण्यासाठीही या फुलाचा विशेष वापर केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत या फुलाच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. पण तरीही याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. चला तर मग मित्रांनो पळस फुलांच्या लागवडीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
उत्तर प्रदेशचे राज्य फूल आहे बर
पळस या फुलाला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. परसा, धक, तेसू, किषक, सुपका, ब्रह्मवृक्ष आणि वनाची ज्योत अशा शब्दांनी या फुलाला वेगवेगळ्या राज्यात ओळखले जाते. पळस हे उत्तर प्रदेशचे राज्य फूल देखील आहे. शेतकरी बांधवांना या फुलाच्या प्रत्येक भागातून चांगला नफा मिळू शकतो. या फुलाला बाजारात मोठी मागणी असल्याने या फुलांची शेती निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायद्याचा फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे.
या राज्यात केली जाते या फुलाची शेती
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की भारतातील अनेक राज्यात या फुलाची शेती केली जात आहे. यामध्ये झारखंड, दक्षिण भारत, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. आपल्या महाराष्ट्रात या फुलाची व्यावसायिक शेती अजूनही केली जात नाही.
उत्तर प्रदेश या राज्यात पळस फुलाची सर्वाधिक लागवड केली जाते. या झाडाची पाने, साल, मूळ आणि लाकूड यांचा वापर विविध सेंद्रिय उत्पादने बनवण्यासाठी केला जातो. त्याची पावडर आणि तेलही बाजारात चांगल्या किमतीत विकले जाते. पळस वृक्ष एकदा लावल्यानंतर 40 वर्षे उत्पादन देत असल्याचं जाणकार दावा करत असतात.
पळस फुलांचे फायदे पण आहेत जबरदस्त
तज्ज्ञांच्या मते, नाक, कान, मल-मूत्र किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून रक्तस्त्राव होत असेल तर पळसच्या झाडाच्या सालाचा 50 मिली रस तयार करून थंड झाल्यावर त्यात साखर मिसळून प्यावे, यामुळे खूप फायदा होतो. पळसच्या डिंकात 1 ते 3 ग्रॅम साखर मिसळून ते दूध किंवा आवळ्याच्या रसात घ्या. यामुळे हाडे मजबूत होतील, तसेच डिंक कोमट पाण्यात मिसळून प्यायल्यास जुलाबावर आराम मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
चांगला नफा मिळू शकतो बर
जाणकार लोकांच्या मते, शेतकर्यांना हवे असल्यास ते पळसची झाडे कमी जमिनीत लावून 30 वर्षांहून अधिक काळ नफा कमवू शकणार आहेत. तसेच शेतकरी बांधव या झाडांमध्ये वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची देखील आंतरपीक म्हणून लागवड करू शकणार आहेत.
यामुळे शेतकरी बांधवांना पळस झाडातून उत्पादन तर मिळणारच आहे शिवाय भाजीपाला शेतीतून अधिक उत्पन्न प्राप्त होणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका एकरात पळस पिकाची 3200 झाडे लावता येतात, जी 3 ते 4 वर्षात फुले देण्यास तयार होत असतात. शेतकरी बांधव कोणत्याही नर्सरीतून पळसाची रोपे विकत आणून या पिकाची शेती सहज सुरू करू शकणार आहेत.