Flax Seed Farming : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती (Farming) करत आहे. शेतीला (Agriculture) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल जात. मित्रांनो आपल्या देशात शेतकरी बांधव (Farmer) वेगवेगळ्या पिकांची शेती करत आहेत.
आपल्या देशात गेल्या अनेक दशकांपासून तेलबिया पिकांची (Oilseed Crop) शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. जवस (Flax Seed) हे देखील एक प्रमुख तेलबिया पीक आहे. याची संपूर्ण भारत वर्षात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आपल्या राज्यात देखील जवस लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यात जवस लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस घटत असले तरीदेखील अजूनही मोठ्या प्रमाणात जवळची शेती आपल्या राज्यात केली जात आहे.
जवस चा उपयोग प्रामुख्याने तेलासाठी केला जातो. मात्र असे असले तरी जवसपासून तेल व्यतिरिक्त देखील अनेक उत्पादने तयार केली जातात. त्यामुळे बाजारात या पिकाला बारामाही मागणी असते. अशा परिस्थितीत या तेलबिया पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते. मित्रांनो असे असले तरी शेतकरी बांधवांना जवस शेतीत काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी जवस या पिकाच्या सुधारित जातींची (Flax Seed Variety) लागवड केली पाहिजे. शेतकरी बांधवांनी या पिकाच्या सुधारित जातींची लागवड केल्यास त्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होणार आहे. शिवाय उत्पादन खर्चात देखील भलीमोठी बचत होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी जवस पिकाच्या सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
जवसच्या सुधारित जाती :-
आरएल 102-71 (त्रिवेणी) (1994):- धान्य आणि फायबर दोन्हीसाठी योग्य, या जातीची उंची 70 सेमी आहे, जी 120 दिवसात परिपक्व होते. यामध्ये तेलाचे प्रमाण 41 टक्क्यांपर्यंत असून उत्पादन 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर आहे. जवस लागवडीची ही जात क्षार सहनशील, करपा रोगास प्रतिरोधक आहे.
चंबळ (1976):- 120-125 दिवसांत पक्व होणाऱ्या या भरड धान्याच्या जातीमध्ये तेलाचे प्रमाण 45 टक्के असते. त्याच्या 1000 दाण्यांचे वजन 9-10 ग्रॅम आहे आणि प्रति हेक्टरी 10-12 क्विंटल उत्पादन मिळते.
याव्यतिरिक्त जवसाच्या सुरभी, जानकी, हिमालिनी, नगरकोल, गरिमा ,शुभ्रा ,नीलम या जाती देखील भारतातील शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रचलित आहेत. जाणकार लोक महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आर- 552,किरण, शितल, जवाहर -23 या जवसाच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला देतात.