Fish Farming: सध्या शेतीसोबतच (Farming) शेती पूरक व्यवसाय (Agri Business) करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. विशेष म्हणजे शेतीपूरक व्यवसायातून शेतकरी बांधवांना (Farmer) लाखों रुपये उत्पन्न (Farmer Income) देखील मिळत आहे. शेती पूरक व्यवसाय शेती बरोबरच करता येत असल्याने शेतकरी बांधवांना अतिरिक्त लाखों रुपयांचा फायदा होत असल्याने अलीकडे शेतकरी बांधव नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीपूरक व्यवसाय करत आहेत.
मत्स्यपालन हा देखील एक फायदेशीर शेती पूरक व्यवसाय आहे. सध्या मत्स्यशेतीकडे शेतकरी बांधवांचा कल दिसून येत आहे. हा एक असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये मर्यादित खर्चात चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी त्यांच्या शेतीसह हा व्यवसाय सहजपणे हाताळू शकतात. यामुळेच आम्ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी मिश्र मत्स्यशेतीबाबत (Mix Fish Farming) माहिती घेऊन हजर झालो आहोत. मिश्र मत्स्यशेती शेतकरी बांधवांना अधिक उत्पन्न मिळवून देत असल्याचा दावा केला जात आहे.
हे तंत्रज्ञान आहे तरी नेमकं कसं
या तंत्रांतर्गत एकाच तलावात विविध प्रकारचे मासे पाळले जातात आणि या माशांच्या स्वभावानुसार अन्नाची काळजी घेण्याची व्यवस्था केली जाते.
काय लक्षात ठेवावे
जेव्हा मिश्र मत्स्य पालनाचा अवलंब केला जातो, तेव्हा सर्वात मोठी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तलावात माशांच्या आहाराची पुरेशी व्यवस्था असावी, जेणेकरून ते जगू शकतील. मिश्र मत्स्यशेतीसाठी दुसरी महत्त्वाची अट म्हणजे पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था असावी जेणेकरून पावसाळ्यात पाणी तुंबल्याने तलाव आणि माशांना इजा होणार नाही.
तलावाचा pH नियंत्रणात ठेवावा लागणार आहे. मिश्र मत्स्यशेती अंतर्गत अल्कधर्मी पाण्याची आवश्यकता असते. म्हणजेच पाण्याचे pH मूल्य 7.5 ते 8 असावे. मिश्र मत्स्यशेतीच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलावात पाण्याचा मार्ग असा असावा की बाहेरील मासे आत जाऊ शकत नाहीत आणि तलावातील मासे बाहेर जाऊ शकत नाहीत.
तलावात कोणत्या माशांना स्थान द्यावे
मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, एकाच तलावात कोणते मासे एकत्र पाळणे चांगले राहील. कातला, रोहू, मृगल आणि सिल्व्हर कार्प, ग्रास कार्प आणि कॉमन कार्प यासारखे विदेशी मासे तलावात एकत्र पाळले जाऊ शकतात. अशा प्रकारे तलावात या माशांचे संगोपन करून शेतकरी मिश्र मत्स्यशेतीचा अवलंब सहज करू शकतात.
माशाचा आहार काय ठेवावा लागेल
तांदळाचा कोंडा आणि मोहरीचे तेल माशांना अन्न म्हणून देता येते. माशांसाठी हे अतिशय पौष्टिक अन्न मानले जाते.
किती मिळणार नफा
मिश्र मत्स्यशेतीच्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानाअंतर्गत एका तलावात वर्षातून दोनदा उत्पादन घेता येते. 1 एकर तलावात मत्स्यशेती करून 15 ते 20 वर्षे उत्पादन सहज मिळू शकते. पाच लाख ते दहा लाख वार्षिक उत्पन्नही सहज मिळू शकते.