Fish Farming : भारतात गेल्या अनेक दशकांपासून शेती (Farming) व शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय (Agriculture Business) केले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने पशु पालन केले जाते. यासोबतच आपल्या देशात मत्स्य पालन व्यवसाय (Fish Farming Business) देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. मत्स्य पालन व्यवसाय शेतकरी बांधवांना चांगली कमाई (Farmer Income) होत असल्याने अलीकडे मत्स्यपालन भारतात खूप लोकप्रिय होत आहे.
आजचे पालन व्यवसाय यात कोळंबी मत्स्यपालन देखील आपल्या देशात झपाट्याने वाढत आहे. कोळंबी मत्स्यपालनातून शेतकऱ्यांना चांगली बक्कळ कमाई होत असल्याने कोळंबी मासळी पालन या व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा (Farmer) कल झपाट्याने वाढत आहे.
कोळंबी शेती ही किनारपट्टीच्या भागात सर्वोत्कृष्ट मानली जात होती, परंतु आता तांत्रिक मदतीमुळे शेतकरी तलावांमध्येही झिंगा पालन म्हणजेच कोळंबी मत्स्यपालन करू शकतात. कोळंबी माशांच्या शेतीतून शेतकरी एक हेक्टर क्षेत्रात तयार केलेल्या तलावातून 4 ते 5 लाख रुपयांचा नफा मिळवू शकतात. निश्चितच शेतकरी बांधवांना हा शेती पूरक व्यवसाय फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे.
कोळंबी मासे पालन
सुरवातीला कोळंबी रोपवाटिका प्रथम तयार करावी लागते. त्यासाठी आधी तलावातील जुने पाणी काढून ते कोरडे केले जाते. तलाव आटल्यानंतर त्याची नांगरणी केली जाते. यानंतर, 1 मीटर पर्यंत पाणी भरले जाते आणि कोळंबीच्या बिया टाकल्या जातात. यात बिया रवा, मैदा आणि अंडी एकत्र करून खाण्यासाठी दिल्या जातात. त्यात 80 टक्के शाकाहारी आणि 20 टक्के मांसाहार अन्न म्हणून द्याव लागते.
बियातून निघणारी अळी साधारण 45 दिवस अशीच ठेवली जाते. यानंतर ही अळी बेबी कोळंबीचे रूप धारण करते. हे छोटे कोळंबी नंतर तलावात सोडले जातात. आम्ही तुम्हाला सांगतो की, झिंगा पालन मत्स्यपालन सोबत देखील करता येते. तसेच, त्याच्या पाण्यात सामान्य pH मूल्य राखण्यासाठी चुना वापरण्याचा सल्ला दिला जातो. लॉबस्टर मासे म्हणजे कोलंबी खाऱ्या आणि गोड्या पाण्यात वाढू शकतात.
लॉबस्टर म्हणजे कोळंबी खाण्याचे फायदे
लॉबस्टर औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे.
त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
थायरॉईड आणि गोइटरच्या रुग्णांसाठी कोळंबी खूप फायदेशीर आहे.
लॉबस्टरमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर असल्याने, त्वचेशी संबंधित रुग्णांसाठी त्याच सेवन खूप फायदेशीर आहे.