Fish Farming : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीसोबतच (Farming) शेतीपूरक व्यवसाय (Agriculture Business) केले जात आहेत. शेतीपूरक व्यवसायातून शेतकरी बांधवांना (Farmer) अतिरिक्त उत्पन्नदेखील (Farmer Income) मिळत आहे.
मित्रांनो मत्स्यपालन (Fish Farming) हा देखील एक शेती पूरक व्यवसाय आहे. खरं पाहता भारतासोबतच जगभरात माशांचा वापर हा वाढतच आहे. फिश ऑइल असो की माशापासून बनवलेले इतर पदार्थ, या सर्व गोष्टींची मागणी बाजारात खूप वाढली आहे. एकट्या भारतात सुमारे 70 टक्के लोक मासे खातात. यामुळेच बहुतांश राज्यांमध्ये शेतीसोबतच मत्स्यपालन क्षेत्रातही झपाट्याने वाढ होत आहे.
मत्स्यपालनासाठी असे तंत्र (Fish Farming Technique) शोधण्यात आले आहे, ज्याद्वारे शेतकरी कमी खर्चात मत्स्यपालन करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. आधुनिक मत्स्यशेतीच्या या तंत्रांमध्ये पिंजऱ्यातील मासे पालनाचा (cage fish farming) समावेश होतो, ज्याला मॅरीकल्चर देखील म्हणतात.
केज फिशिंग किंवा पिंजरा मत्स्यपालन कसे करावे बर
पिंजरा मत्स्यपालन अंतर्गत, सर्वप्रथम, विविध प्रजातींच्या माशांच्या संगोपनासाठी पिंजरे बनवले जातात. त्यांची लांबी किमान 2.5 मीटर, रुंदी- 2.5 मीटर आणि उंची किमान 2 मीटर असावी. या पिंजऱ्यात माशांच्या बिया किंवा बीज टाकून पेटीच्या आजूबाजूला सीव्हीड्सही लावले जातात. सी विड हे समुद्री तण आहे जे की फक्त पाण्यात उगवले जातात. बाजारात मासळीबरोबरच सागरी तणांनाही मोठी मागणी आहे. अशाप्रकारे पिंजऱ्यातील मत्स्यपालनासह सागरी तणांची लागवड केल्यास कमी खर्चात दुप्पट उत्पादन मिळते आणि शेतकऱ्यांनाही याचा भरपूर फायदा होतो.
पिंजरा मत्स्यपालणाचे फायदे
पिंजऱ्यातील मत्स्यपालन तंत्रामुळे माशांचा विकास जलद होतो आणि मासे अल्पावधीत मोठे होतात.
मत्स्यपालकांना हवे असल्यास विविध प्रकारचे मासे वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवून दुप्पट नफा मिळवू शकतात.
अशाप्रकारे पिंजऱ्यात मत्स्यशेती केल्याने कमी पाण्याच्या क्षेत्राला वेढून अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.
या तंत्राच्या मदतीने मासे निरोगी आणि सुरक्षित राहतात आणि माशांना जास्त काळजी घेण्याची आवश्यकता नसते.
पिंजऱ्यात मत्स्यपालन केल्याने व्यवस्थापनाची कामे सुलभ होतात आणि वारंवार पाणी बदलण्याची समस्या दूर होते.
तलाव आणि डबक्यांमध्ये माशांचा योग्य विकास होत नाही आणि खुल्या वातावरणात मासे चोरीला जाण्याचीही शक्यता असते.
दुसरीकडे, पिंजरा मत्स्यपालन करून, कमी जोखमीमध्ये माशांचे चांगले उत्पादन घेऊन आपण चांगले पैसे कमवले जाऊ शकतात.
या गोष्टींची विशेष काळजी घ्या
मत्स्यपालनाच्या या विशेष तंत्राद्वारे दोन प्रकारचे पिंजरे बनवता येतात, ज्यामध्ये एक पिंजरा त्याच्या जागी राहतो. दुसरीकडे, इतर प्रकारचे पिंजरे पाण्यात तरंगत राहतात.
एका ठिकाणी स्थिर पिंजरा बनवण्यासाठी किमान 5 मीटर खोलीचा पाण्याचा स्रोत असावा.
पाण्यात तरंगणारा पिंजरा टाकण्यासाठी पाण्याच्या स्त्रोताची खोली 5 मीटरपेक्षा जास्त असावी.
ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्चित होईल अशा प्रकारे पिंजऱ्यातील माशांचे व्यवस्थापन करा.
पिंजरा शेतीतून उत्पन्न
माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, कर्नाटकच्या किनारी भागातील बहुतांश शेतकरी कर्नाटकात पिंजऱ्यात मत्स्यपालन करून चांगले उत्पन्न घेत आहेत. येथे ICAR-CMFRI, Mangalore च्या मदतीने मत्स्य शेतकरी पिंजऱ्यातील माशांच्या व्यतिरिक्त पिंजऱ्यात हिरवे शिंपले शेती आणि सागरी तणांची लागवड करत आहेत. अशाप्रकारे 500 पिंजऱ्यांमध्ये मत्स्यपालन केले जात असून, यातून मत्स्यपालक वार्षिक 10 कोटींपर्यंत कमाई करत आहेत.