FD News : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीमपूर्ण ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागले आहे.
मात्र असे असले तरी आजही अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व देत आहेत. याचे कारण म्हणजे एफडीमधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. शिवाय अलीकडे एफडीसाठी चांगले व्याजदर देखील ऑफर केले जात आहे.
विविध सरकारी आणि प्रायव्हेट बँका एफडीसाठी चांगले व्याज देत आहेत. अशातच बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे नुकत्याच तीन ते चार दिवसांपूर्वी बँक ऑफ बडोदाने एफडीच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बँक ऑफ बडोदामध्ये एफडी करणाऱ्यांना आता चांगला परतावा मिळू शकणार आहे.
जर तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी बँक ऑफ बडोद्याचा हा निर्णय फायदेशीर ठरू शकतो. दरम्यान आता आपण बँक ऑफ बडोदा ने कोणत्या कालावधीच्या एफडी व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे हे जाणून घेणार आहोत.
बँक ऑफ बडोदा FD चे नवीन दर
बँक ऑफ बडोदा ने फक्त बल्क एफडीच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. बल्क एफडी अर्थातच दोन कोटी रुपयांपासून ते दहा कोटी रुपयापर्यंतच्या एफडी व्याजदरात सुधारणा करण्याचा निर्णय बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकेने घेतला आहे.
यानुसार आता बल्क एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांना एका वर्षाच्या एफडी साठी 7.80 टक्क्यांपर्यंतचे व्याज मिळू शकणार आहे.
बल्क एफडी साठी बँकेच्या माध्यमातून पाच टक्क्यांपासून ते 7.80% पर्यंतचे व्याजदर ऑफर केले जाणार आहे. सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीपर्यंतच्या एफडी साठी हे व्याजदर ऑफर होणार आहे.
यामध्ये सर्वाधिक व्याजदर 9 ते 10 कोटी रुपयांच्या एफडीसाठी आणि एका वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाणार आहे.
नऊ ते दहा कोटी रुपयांच्या आणि एका वर्षाच्या एफडीसाठी बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकेकडून तब्बल 7.80% एवढे व्याज ऑफर केले जाणार आहे.