Farming Success Story : भारतात सध्या नवयुवक तरुण शेती व्यवसायाकडे (Farming) अधिक आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे. नवयुवक सुशिक्षित तरुणांचा विश्वास नोकऱीपेक्षा शेतीवर (Agriculture) अधिक वाढला आहे. हेच कारण आहे की आता उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा सुशिक्षित तरुण शेती व्यवसायाला अधिक प्राधान्य देत आहेत.
काही सुशिक्षित तरुण-तरुणी अलीकडे नोकरीला (Job) लाथ मारत शेती व्यवसायात येऊ लागले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला शेतकऱ्याची (Women Farmer) गोष्ट सांगणार आहोत, जिने आपली चांगल्या जंगी पगाराची नोकरी सोडून आपले आयुष्य पूर्णपणे शेतीसाठी वाहून घेतले आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही यशस्वी शेतकरी (Successful Farmer) अंकिता कुमावत आहे, जी अजमेरची रहिवासी आहे, तिला लहानपणापासून शेतीची आवड होती. अंकिताने आयआयएम कोलकाता येथून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही वर्षे नोकरी देखील केली आहे.
मात्र असे असले तरी त्यांचे नोकरीत कधीच मन रमले नाही. यामुळे त्यांनी कंपनीत काम करण्यापेक्षा शेती करण्यास अधिक पसंती दर्शवली. शेतीचे अगदी लहानपणापासून आवड असल्याने त्यांनी 2014 मध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली.
दरवर्षी 22 लाखांचा मिळतोय नफा
अंकिताच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या शेतात गहू, तीळ, आवळा, खजूर आणि इतर अनेक भाज्या पिकवते. विशेष म्हणजे हे सर्व ती सेंद्रिय पद्धतीने पिकवत आहे. यामुळे त्यांनी उत्पादित केलेला शेतमाल इतरांपेक्षा अधिक सरस आहे. या सर्वांसोबतच ती अधिक उत्पन्नासाठी दुग्धव्यवसाय देखील चालवते, जे कि पूर्णपणे एकात्मिक शेतीवर आधारित आहे.
मित्रांनो आम्ही इथे नमूद करू इच्छितो की, या तंत्रामध्ये शेतकरी शेती आणि पशुपालनासह शेतीशी संबंधित सर्व कामे एकाच ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतो. याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. शेती आणि पशुसंवर्धनाशी संबंधित सर्व गोष्टी एकाच ठिकाणी केल्या जात असल्याने शेतकरी बांधवांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो.
शिवाय यामुळे उत्पादनात वाढ होते. या तंत्राचा वापर करून अंकिता दरवर्षी सुमारे 22 लाख रुपयांचा नफा कमवत आहे. अंकिता तिच्या शेतात आवळा लागवड, मधमाशी पालन, सेंद्रिय पद्धतीने नमकिन तयार करणे इत्यादी अनेक प्रकारची कामे देखील करते. यामुळे अंकिताला शेतीतून चांगली कमाई होत आहे. निश्चितच चांगल्या पगाराची नोकरी सोडत शेती व्यवसायातून मिळवलेले हे यश इतर शेतकऱ्यांसाठी (Farmer) प्रेरणादायी ठरेल.