Farming Success Story : मित्रांनो अलीकडे शेती व्यवसायात (Farming) सातत्याने शेतकरी बांधवांना (Farmer) नुकसान सहन करावे लागत असल्याने आता नवयुवक शेतकरी पुत्र शेती पासून दुरावत आहेत. मात्र जर शेतकरी बांधवांनी काळाच्या ओघात शेतीमध्ये (Agriculture) बदल केला आणि बाजारात मागणी मध्ये असलेल्या तसेच अल्प कालावधीतच तयार होणाऱ्या भाजीपाला पिकांची जर शेती केली तर निश्चितच शेतकरी बांधवांना शेतीतून चांगली कमाई (Farmer Income) होणार आहे. जम्मू काश्मीर मधील एका अवलिया शेतकऱ्याने देखील भाजीपाला शेतीतून (Vegetable Farming) लाखों रुपये उत्पन्न करून दाखवले आहे.
जम्मू काश्मीर मधील शोपीया जिल्ह्यातील मोहम्मद अयूब नामक तरुणाने ग्रॅज्युएशन केल्यानंतर नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी पायपीट केली. मात्र तरीदेखील त्याला नोकरी मिळाली नाही. मग काय शेवटी या पठ्ठ्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्याचा हा निर्णय त्याच्यासाठी फायद्याचा ठरला असून आजच्या घडीला हा नवयुवक शेतीमधून वर्षाकाठी सहा लाख रुपयांची कमाई करण्याची किमया साधत आहे. यामुळे सध्या या अवलियाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
6 लाखांचा वार्षिक नफा मिळतोय बर…!
मीडिया रिपोर्टनुसार, मोहम्मद अयुब यांची 2 एकर जमीन आहे. अशा परिस्थितीत कमी शेत जमिनीत अधिक उत्पन्न मिळवून आहे त्यांच्यासाठी आव्हानात्मक काम होते. मात्र त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करत घरात सदैव मागणी मध्ये असलेल्या भाजीपाला पिकांची शेती सुरू केली. सध्या ते आपल्या शेतात अनेक प्रकारच्या भाज्यांची लागवड करतात. मोहम्मद अयुबच्या म्हणण्यानुसार, त्यांना वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
मोहम्मद अयुब सांगतात की, तो फक्त त्याच भाज्या पिकवतो, ज्यांना बाजारात खूप मागणी आहे. हिवाळ्यातही ते आपले शेत रिकामे ठेवत नाहीत. निश्चितच शेतकरी बांधवांनी बाजारात जे विकेलं त्याच पिकांची शेती केली तर त्यांना शेतीतून लाखोंची कमाई सहजरीत्या करता येणे शक्य होणार आहे. अयुब यांच्यामते, जम्मू काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड केली जाते. यामध्ये विशेषता सफरचंद पिकाची शेती केली जाते.
मात्र, या पिकाची आवक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात होत असल्याने सफरचंद पिकाला आता मात्र 20 ते 25 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. परंतु जर शेतकरी बांधवांनी काळाच्या ओघात बदल करत भाजीपाला पिकांची लागवड केली तर त्यांना पन्नास रुपये प्रति किलोपर्यंतचा बाजार भाव भाजीपाला पिकांना मिळणार आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी बाजारपेठेत कायम मागणी मध्ये असलेल्या भाजीपाला पिकांची शेती केली पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.