Farming Success Story : अलीकडे आपल्या देशात फळबाग शेतीकडे (Farming) शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत आहेत. उत्पन्न (Farmer Income) वाढीच्या अनुषंगाने आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांनी देखील गेल्या अनेक वर्षांपासून फळबाग लागवडीला अधिक प्राधान्य दिले आहे.
विशेष म्हणजे आता उच्चशिक्षित तरुण देखील शेती व्यवसायाकडे वळू लागले आहे. काही नवयुवक आपल्या चांगल्या पगाराची नोकरी वर (Job) तुळशीपत्र ठेवत शेती व्यवसायात उतरत आहेत. नोकरीमध्ये मन रमत नसल्याने आता नवयुवक पुन्हा एकदा शेतीकडे (Farming) वळले आहेत.
हिमाचल प्रदेश मधील एका अवलियाने देखील आपल्या चांगल्या पगाराच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवत शेतीला निवडल आहे. विशेष म्हणजे हा अवलिया आजच्या घडीला शेतीतून लाखोंची कमाई देखील करत आहे. मित्रांनो हिमाचल प्रदेश मधील मनदीप वर्मा या तरुणाने चेहरा मधले आपली नोकरी सोडून गावाकडे परतत शेती करण्यास सुरुवात केली आहे. हिमाचलमध्ये त्यांनी नापीक पडलेली जमीन खरेदी केली.
त्यांनी पाच एकर शेतजमिनीत फळबाग लागवड केली आणि तब्बल 40 लाखांची कमाई आता त्यांना होत आहे. मनदीप वर्मा यांनी त्यांच्या 5 एकरच्या शेतीला स्वस्तिक फार्म असं नाव दिलं आहे. या जमिनीमध्ये सफरचंद आणि किवीची बरीच झाडे त्यांनी लावली आहेत, ज्याची काळजी घेण्यासाठी पूर्णपणे सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धती वापरल्या जात आहेत. येथे रसायनांना कोणतंच स्थान नाही आणि कीटकनाशकांचाही वापर केला जात नाही. यामुळे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या फळांना बाजारात देखील चांगला बाजारभाव मिळत आहे.
MNC ची नोकरी सोडून शेती करायला सुरुवात केली
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मनदीप वर्मा यांनी 2010 मध्ये एमबीए केले होते. एमबीए केल्यानंतर त्यांनी व्यवसाय विपणनासाठी एका प्रतिष्ठित मल्टिनॅशनल कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. सुमारे 4 वर्षांच्या IT जॉबमध्ये मनदीपने बरीच प्रगती केली आणि अनेक नेटवर्कही बनवले, पण कामाचा ताण वाढत असताना त्याने स्वतःच्या व्यवसायाचे नियोजन करण्यास सुरुवात केली.
मग काय त्यांना अगदी लहानपणापासून आपल्या गावाची ओढ असल्याने त्यांनी गावात परतत शेती करण्याचा निर्णय घेतला. इतरांपेक्षा वेगळे, मनदीपने आपल्या शिक्षण आणि कौशल्याच्या धर्तीवर फळ बागायती करण्याचा विचार केला आणि शिल्ली, हिमाचल येथे 4.84 एकर नापीक वडिलोपार्जित जमिनीवर बागकाम सुरू केले. ना शेतीचे ज्ञान, ना पिकांचा अनुभव आणि नापीक जमीनीवर पूर्ण जंगली वनस्पती वाढलेल्या होत्या.
अशा परिस्थितीत मनदीपने हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या जमिनीवर सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अनेक संकटे आली. शिल्ली येथे असलेली त्यांची वडिलोपार्जित जमीन पूर्णपणे उतारावर होती. अशा परिस्थितीत सर्वप्रथम जंगली झाडे काढून शेताची सपाटीकरण करून शेणखतासोबत सेंद्रिय पदार्थ टाकून शेत तयार करण्यास सुरुवात केली.
इंटरनेट वरून माहितीची जमवाजमव केली
अलीकडे इंटरनेटचा वापर मोठा वाढला आहे. या युगात इंटरनेटवर सर्व काही उपलब्ध आहे. शेतीविषयक ज्ञान देखील इंटरनेटवर उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत मनदीपने शेती करण्याआधी सोशल मीडिया आणि यूट्यूबवरून शेतीसाठी आवश्यक ज्ञानाची जमवाजमव सुरू केली. मनदीप यांनी इंटरनेटवरून सेंद्रिय व नैसर्गिक शेती करून तृणधान्ये लागवड कशी करावी याची माहिती जमवली.
या कामाचा अनुभव नसल्याने त्यांनी कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांशी संपर्क साधून सल्लामसलत सुरू ठेवली. अशाप्रकारे स्वस्तिक फार्म सुरू करण्यासाठी सुमारे 5 महिने लागले. यानंतर माकडांच्या दहशतीबाबतही चिंता निर्माण झाली होती, त्यानंतर सुरक्षित फळ किवी पिकवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की किवीचा वरचा भाग त्वचेसारखा असतो, ज्यावर केस बनलेले असतात. त्यामुळे माकडे ते खात नाहीत. मनदीपने किवी फळाची लागवड करण्यापूर्वी हिमाचल प्रदेश कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांशी संपर्क साधला आणि 150 किवी रोपांची लागवड करून बागकाम सुरू केले.
जीवामृतचा प्रभावी वापर करण्यात आला
नैसर्गिक शेतीखालील क्षेत्र वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे आता शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देत आहेत. विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास खर्च व श्रमही कमी लागतात शिवाय पिकांपासून दर्जेदार उत्पादनही मिळते. मनदीप वर्मा यांनीही यूट्यूबवरून असेच ज्ञान गोळा केले होते. यानंतर त्यांनी किवी बागेतून नफा मिळविण्यासाठी जीवामृत वापरण्यास सुरुवात केली.
सुरुवातीपासूनच शेण, गोमूत्र, गूळ, बेसन आणि इतर सेंद्रिय पदार्थांपासून बनवलेले जीवामृत मातीत वापरले जात होते. एवढेच नव्हे तर चवळी, गहू, हरभरा, काळा हरभरा, हिरवी मूग डाळ, तीळ आणि हरभरा अशी सात धान्ये मिसळून सप्त धनांकुर हे पारंपरिक खत बनवले आणि त्यात युरियाऐवजी पाणी आणि गोमूत्र मिसळून फवारणी सुरू केली. आतापर्यंत मनदीप झाडांवर फुलांच्या वेळी फवारणी करतो. त्यामुळे कीटक-रोग लागण्याची शक्यताही कमी होते.
सेंद्रिय शेतीतून 40 लाख रुपये कमवतोय बर…!
2016 मध्ये, जेव्हा मनदीप वर्मा यांनी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या फळांचे पहिले उत्पादन बाजारात विकले तेव्हा किवी फळे 350 रुपये प्रति किलो दराने विकली गेली. ही चांगली सुरुवात होती. यानंतर, 2017 मध्ये, स्वस्तिक फार्मची नोंदणी करून, एक वेबसाइट तयार केली गेली, ज्यावरून आज उत्तराखंड, चंदीगड, हरियाणा, पंजाब, दिल्ली, हैदराबाद आणि बंगलोरचे ग्राहक जोडले गेले आहेत. यानंतर 2018 मध्ये इटालियन जातीच्या सफरचंदाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. कमी उंचीचे हे झाड वर्षातून एकदाच फळ देते.
याशिवाय 12 हजार रोपांची लागवड करून दोन रोपवाटिका केल्या आणि पुन्हा स्वस्तिक फार्ममध्ये 14 लाखांची गुंतवणूक केली. जेव्हा नफा वाढत गेला तेव्हा लोक त्याची शेती पाहायला येऊ लागले आणि त्याच्या शेतीतील सेंद्रिय फळांची मागणी करू लागले. आज, मनदीप वर्मा यांच्या स्वस्तिक फार्ममध्ये सुमारे 700 किवीची झाडे आहेत, ज्यातून 9 टन फळे मिळतात. दुसरीकडे, मनदीप वर्मा सफरचंदाच्या झाडांच्या उत्पादनाची भर घालून 40 लाख रुपये वार्षिक उत्पन्न घेत आहेत. किवीची वाढती मागणी आणि सेंद्रिय शेतीचा ट्रेंड यामुळे 40 टनांपर्यंत किवीचे उत्पादन लवकरच उपलब्ध होईल, असा त्यांचा विश्वास आहे.