Farming Success Story : लहानपणापासूनच प्रत्येक व्यक्तीच स्वप्न असतं की त्याने चांगले उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगारातील नोकरी करावी. खेड्यात राहणाऱ्या लोकांचे देखील उच्च शिक्षण घेतल्यानंतर शहरात जाऊन नोकरी (Job) करन्याचे आणि आपला संसार थाटामाटात चालवण्याचे स्वप्न असते.
मात्र देशात असेही अनेक लोक आहेत जे जंगी पगाराची नोकरी सोडून सुख शोधत आपल्या गावाकडे प्रस्थान करून आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी शेती (Farming) करत आहेत. विशेष म्हणजे असे लोक शेतीमध्ये मोठे दैदिप्यमान काम करून लाखो रुपयांची कमाई देखील करत आहेत. उत्तराखंड मधील बागेश्वर जिल्ह्यातील एका अवलियाने देखील असंच काहीसं केल आहे.
चंद्रशेखर पांडे यांनी शहरातले आपली चांगली नोकरी सोडून गावाकडे परतत शेतीमध्ये एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. चंद्रशेखर यांनी आपल्या गावातील वाढत्या स्थलांतराची समस्या थांबवण्यासाठी 22 वर्षांच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवले आहे. या अवलियाने सेंद्रिय शेतीच्या (Organic Farming) माध्यमातून लाखोंची कमाई (Farmer Income) करून दाखवली आहे.
स्थलांतराची चिंता भेडसावत होती
मित्रांनो खरे पाहता चंद्रशेखर पांडे यांचा जन्म बागेश्वर जिल्ह्यातच झाला, पण अभ्यासासोबतच रोजगाराच्या शोधात ते मुंबई या मायानगरीत स्थायिक झाले. मायानगरी मुंबईत त्यांना हाताला चांगले काम होते आणि पैसा देखील बक्कळ मिळत होता. चंद्रशेखर त्याच्या सर्व आकांक्षा पूर्ण करत शहरात प्रगती करत होता, पण त्याच दरम्यान त्याची गावाशी आणि मातीशी असलेली ओढही वाढत होती. जेव्हा जेव्हा त्यांना स्थलांतराची किंवा कुटुंबे गावापासून दूर गेल्याची बातमी मिळायची तेव्हा-तेव्हा ते अस्वस्थ व्हायचे. अखेर चंद्रशेखर यांनी वाढत्या स्थलांतर बघता मायानगरी मुंबई मध्ये असलेली आपली 22 वर्षाची नोकरी सोडली आणि आपल्या जन्मभूमी कडे प्रस्थान केले.
सेंद्रिय शेतीसाठी रोजगार उपलब्ध करून देतात
आपल्या राज्यातील लोकांसाठी जरा हटके आणि काहीतरी चांगलं करावे या उदांत हेतूने चंद्रशेखर यांनी आपली जन्मभूमी गाठली. उत्तराखंडमधील बागेश्वर येथे परत आल्यावर चंद्रशेखर पांडे यांनी शेती क्षेत्र निवडले. आणि सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुटुंबासह गावातील इतर कुटुंबांना जोडण्यास सुरुवात केली. हळूहळू सेंद्रिय शेतीमध्ये त्यांनी गावातील 12 कुटुंबे आपल्यासोबत जोडली.आज ही कुटुंबे चंद्रशेखर पाडे यांच्यासह सेंद्रिय शेती करून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत.
औषधी पिकांच्या शेतीतून (Medicinal Plant Farming) कमाई हमखास
देवभूमी उत्तराखंडला वनौषधींची भूमी आणि संजीवनीची धरती म्हटले जाते हे उघड आहे. यामुळेच चंद्रशेखर पांडे यांनी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला आणि औषधी वनस्पतींच्या शेतीला सुरुवात केली. त्यांनी अश्वगंधा, कॅमोमाईल, लेमनग्रास, लेमनबाम, डँडेलियन, रोझमेरी, भूमी आवळा, आवळा, रिठा, हरड, वंतुलसी, रामतुलसी, श्यामा तुळशी इत्यादी औषधी तसेच भाजीपाला वर्गीय पिकांची शेती केली.
या औषधांची लागवड आणि प्रक्रिया करण्यासाठी त्यांना 12 शेतकरी कुटुंबे मदत करतात. एवढेच नव्हे तर या औषधांच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळण्याबरोबरच ग्रामस्थांच्या आरोग्याच्या विविध समस्या जसे साखर, रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार, दमा, डोकेदुखी, सर्दी, ताप यासह अनेक लहान-मोठ्या समस्या आजारांवरही उपचार केले जातात.
राज्यातून होणारे स्थलांतर थांबवायचे स्वप्न आहे चंद्रशेखरच
बागेश्वरमधील त्यांच्या गावात ग्रामीण रोजगाराच्या माध्यमातून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनंतर आता चंद्रशेखर पांडे यांना संपूर्ण राज्यातून ही समस्या दूर करायची आहे. त्याचप्रमाणे हिमालयीन प्रदेशात औषधी वनस्पतींची शेती आणि वनौषधींची शेती, भाजीपाला सेंद्रिय शेती, मत्स्यपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय करून स्थलांतर थांबवण्याचे प्रयत्न करणे हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले असून यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत आहेत.