Farming Success Story : अलीकडे आपल्या देशात नवयुवक शेती (farming) नको रे बाबा असा ओरड करत आहेत. शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता शेतकरी बांधव (farmer) देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घ्यावे आणि एखाद्या चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करावे किंवा सरकारी नोकरदार म्हणून आपले आयुष्य सुखकर करावे असे स्वप्न पाहत आहेत. मात्र अशा काळातदेखील असेही नवयुवक आहेत जे की शेती व्यवसायाला करिअर म्हणून निवडत आहेत.
विशेष म्हणजे असेही काही सुशिक्षित नवयुवक आहेत जे आपल्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती व्यवसायात आपला हात आजमावत आहेत. मित्रांनो ललित आणि खुशबू हे देखील असेच एक जोडपे आहे. या नवरा-बायकोच्या जोडीने आपल्या चांगल्या पगाराच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवत शेतीसारख्या जोखमीच्या क्षेत्रात आपले करिअर वाढवण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे त्यांचा हा निर्णय यांच्यासाठी फायद्याचा ठरला असून आजच्या घडीला हे जोडपं शेतीतून करोडो रुपयांची कमाई (farmer income) करत आहे. मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार, जोधपूरचा रहिवासी असलेला ललितने एमबीए केल्यानंतर बँकेत काम केलं, तर त्याची पत्नी चार्टर्ड अकाउंटंट होती.
मात्र नोकरी करताना नोकरीमध्ये समाधान त्यांना मिळाले नाही. अशा परिस्थितीत या जोडप्याने (successful farmer) अचानक नोकरीला त्यागपत्र देण्याचा निर्णय घेतला. नोकरीवर (job) तुळशीपत्र ठेवल्यानंतर या जोडप्याने शेतीच्या कामात स्वतःला वाहून घेतले आहे. विशेष म्हणजे या अवलिया जोडप्याने सेंद्रिय शेती सुरू केली आहे आणि तो एक फायदेशीर व्यवसाय देखील बनवला आहे. आज राजस्थानच्या बहुतांशी शेतकऱ्यांना त्यांनी बनवलेल्या पॅटर्नचा अवलंब करून चांगला नफा कमवायचा आहे.
खरं पाहता ललितने सुरुवातीला फक्त सेंद्रिय शेतीबद्दल ऐकले होते. या क्षेत्रात उतरायचे ठरवल्यावर त्यांनी सेंद्रिय शेतीवर (organic farming) संपूर्ण संशोधन केले. पुण्यात एमबीए करण्यासाठी गेल्यावर ग्रीन हाऊस आणि पॉलीहाऊसबद्दल ऐकले आणि पाहिल्याचे ते सांगतात. मग त्यांना वाटलं की त्यांची देखील अशी नर्सरी असायला हवी होती. मग काय नोकरी सोडल्यानंतर त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरू पाहात होतं. जेव्हा सेंद्रिय शेती त्यांनी सुरू केली तेव्हा आपल्या जमिनीवर हरितगृह आणि पॉलीहाऊस बांधून अप्रतिम रोपवाटिका त्यांनी सुरू केली.
त्यानंतर सेंद्रिय फळे आणि भाज्यांची लागवड केली गेली. पॉलीहाऊससाठी वडिलांकडून वडिलोपार्जित जमीन मागितल्याचे ललित सांगतात. सुरुवातीला वडिलांना पटले नाही, नंतर हळूहळू त्यांनीही होकार दिला. त्यांनी सुरुवातीला फक्त एक लाख रुपये गुंतवले होते. आज त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 कोटींहून अधिक आहे. ललितची अर्धांगिनी खुशबू ही व्यवसायाने सीए होती. अशा परिस्थितीत शेतीचे क्षेत्र त्यांच्यासाठी देखील नवीन होते.
मात्र आता शेतीमधील बारकावे त्यांना व्यवस्थितरित्या समजले असून हळुहळू आता ती सगळा शेती व्यवसाय सांभाळत आहे. राजस्थानसारख्या कोरडवाहू राज्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या नवीन कल्पना देऊन त्यांना नफा मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्या सांगतात.
आत्तापर्यंत त्यांनी 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना शेतीचे गुण शिकवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. निश्चितच शेतीमध्ये या जोडप्याने केलेली ही कामगिरी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारी सिद्ध होणार आहे. जे लोक शेती म्हणजे केवळ घाट्याचा सौदा आणि त्यातच सेंद्रिय शेती म्हणजे हा निव्वळ बावळटपणा आहे अशा म्हणणार्या लोकांना या जोडप्याने आरसा दाखवून दिला आहे.