Farming Business Idea : आपल्या देशात शेतीमध्ये (Farming) बदल केला जात असून आता नगदी (Cash Crops) तसेच बाजारात कायम मागणीमध्ये असलेल्या पिकांच्या लागवडीकडे कल वाढला आहे. आता पारंपरिक पिकांना शेतकरी बांधव (Farmer) फाटा दाखवत असून नगदी पिकांची शेती करत आहेत.
तसेच शेतकरी बांधव आता वेगवेगळ्या झाडांच्या लागवडीकडे (Tree Farming) वळले असल्याच चित्र आहे. यातील अनेक झाडे अशी आहेत की ते शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे बंपर नफा (Farmer Income) मिळवण्याची संधी देतात. मात्र, झाडांच्या लागवडीतून नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी संयम बाळगण्याची गरज आहे.
या झाडांची लागवड करा बक्कळ कमवा
चंदनाची लागवड:- चंदन ही एक सुगंधित औषधी वनस्पती आहे. या झाडाची शेती आपल्या देशात तसेच आपल्या राज्यात देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. या लाकडापासून औषधे, परफ्यूम, साबण, सौंदर्य प्रसाधने आणि तेल अशा अनेक उपयुक्त गोष्टी बनवल्या जातात.
जाणकार लोक दावा करतात की या झाडाचे एक किलो लाकूड 27 हजार रुपये किमतीला बाजारात विकले जाते. तज्ज्ञांच्या मते, एका चंदनाच्या झाडापासून तुम्ही 5 ते 6 लाख रुपये कमवू शकता. एका एकरात तुम्ही सुमारे 600 चंदनाची झाडे लावू शकता. अशा परिस्थितीत जर तुम्ही एका एकरात याची लागवड करत असाल तर तुम्ही 12 वर्षात 30 कोटी कमवू शकता. निश्चितच या झाडाची शेती शेतकरी बांधवांसाठी मोठी फायद्याची ठरणार आहे.
सागवान लागवड:- सागवान या झाडाची आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या झाडापासून मिळणाऱ्या लाकडाला बाजारात मोठी मागणी आहे. शिवाय हे लाकूड सर्वात मजबूत असल्याचे सांगितले जाते. या लाकडाला बाजारात कायमच चांगला दर मिळतो. या लाकडाचा उपयोग प्लायवूड बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय सागवानाचा उपयोग औषधी बनवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचा दावा आहे.
हे लाकूड दीर्घकाळ टिकून राहण्यास सक्षम आहे. अशा परिस्थितीत या लाकडाची बाजारपेठेत मागणी नेहमीच राहते. सागवान लाकडात फारच कमी आकुंचन असते. तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी एक एकर शेतात सागाची लागवड केल्यास सुमारे 120 सागवान रोपे लावली जातात. ही झाडे काढणीसाठी तयार झाल्यावर मिळणारी कमाई करोडोंच्या घरात पोहोचते.
निलगिरी लागवड:- आपल्या देशातील शेतकरी बांधव निलगिरी या झाडाची व्यावसायिक स्तरावर लागवड करत असल्याचे चित्र आहे. जाणकार लोक सांगतात की, खोके, इंधन, हार्ड बोर्ड, फर्निचर आणि पार्टिकल बोर्ड इत्यादी बनवण्यासाठी या झाडाच्या लाकडाचा वापर केला जातो.
विशेष म्हणजे निलगिरीचे झाड झाड केवळ 5 वर्षांत चांगले विकसित होते. पाच वर्षानंतर या झाडाच्या लाकडाचा वापर सुरू होतो. निलगिरी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मते, एका झाडापासून सुमारे 400 किलो लाकूड मिळते. बाजारात निलगिरीचे लाकूड सहा ते सात रुपये प्रति किलो दराने विकले जाते. अशा परिस्थितीत एका हेक्टरमध्ये तीन हजार झाडे लावली तर. त्यामुळे तुम्ही 72 लाख रुपये सहज कमवू शकता. निश्चितच निलगिरी शेती शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा नफा मिळवून देणार आहे.