Farming Business Idea : आपल्या देशात गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधवांनी (Farmer) उत्पादन वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra) देखील फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
चिकू हे देखील असंच एक फळबाग पीक आहे. चिकूचे रोप लागवडीनंतर (Sapodilla Farming) अनेक वर्षे उत्पादन देते. याचे फळ स्वादिष्ट तसेच पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, टॅनिन, ग्लुकोज असे अनेक पोषक घटक चिकूमध्ये आढळतात.
तणाव, अशक्तपणा, मूळव्याध आणि पोटाशी संबंधित आजारांमध्ये चिकूचे सेवन फायदेशीर आहे. यासोबतच याच्या सेवणाने श्लेष्मा आणि जुनाट खोकलाही बरा होतो. अशा परिस्थितीत चिकूला बाजारात बारामाही मागणी असते. शिवाय चिकूला (Sapodilla Crop) चांगला बाजार भाव देखील मिळतो. यामुळे या पिकाची लागवड शेतकऱ्यांना बक्कळ पैसा कमवून देत आहे. भारतात चिकूची लागवड (Farming) प्रामुख्याने केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये केली जाते.
चिकू शेतीसाठी उपयुक्त हवामान आणि शेत जमीन
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, चिकूची लागवड उष्णकटिबंधीय हवामानात (Climate) केली जाऊ शकते. महाराष्ट्रातील हवामान या पिकाच्या शेतीसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे जाणकार नमूद करतात. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात चिकूची लागवड मोठ्या प्रमाणात बघायला मिळते.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील चिकू उत्पादक शेतकरी बांधव याच्या पिकातून चांगली कमाई देखील करत आहेत. पाण्याचा चांगला निचरा होणारी वालुकामय चिकणमाती असलेली जमीन चिकूच्या लागवडीसाठी उत्तम असते. ज्या शेतजमिनीचा मातीचा pH 5.5 ते 7.5 च्या दरम्यान असतो अशी शेतजमिनी चिकू लागवडीसाठी उपयुक्त असते.
चिकूच्या सुधारित जाती कोणत्या आहेत बर
खरं पाहता चिकूचा उगम मध्य अमेरिकेतला आहे. पण आज ती जगभर पसरली आहे. भारतातही चिकूच्या अनेक सुधारित जाती आहेत. ज्यामध्ये तपकिरी पान, पिवळे पान, काळे पान, क्रिकेट बॉल, pkm2 संकरित या प्रमुख सुधारित जाती आहेत.
चिकू लागवडीसाठी योग्य वेळ
चिकू लावणीसाठी जुलै ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ आहे. सिंचनाची योग्य व्यवस्था असल्यास मार्चमध्येही लागवड करता येते. लावणीपूर्वी खड्डा चांगला तयार करावा.
चिकू लागवडीतील खर्च आणि कमाई
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, एक हेक्टर जमिनीवर चिकुची 300 पेक्षा जास्त झाडे लावली जाऊ शकतात. चिकूच्या झाडांना वर्षभर फळे येतात, परंतु मुख्य पीक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येते. एका झाडापासून सरासरी 130 किलो उत्पादन मिळते. 300 झाडे सुमारे 20 टन उत्पादन देतात. बाजारात त्याची किंमत 50 ते ₹ 70 प्रति किलो पर्यंत आहे. अशा परिस्थितीत एक हेक्टर जमिनीत शेतकरी बांधवांनी चिकूची 300 झाडे लावल्यास त्यांना जवळपास दहा लाखांपर्यंतची कमाई होऊ शकते.