Tractor News : भारतात वाहतुकीचे नियम फार कडक आहेत. मात्र, असे असतानाही अनेक जण वाहतुकीचे नियम मोडतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास सदर व्यक्ती विरोधात कायद्याने दंडात्मक कारवाई केली जाते तसेच काही प्रकरणांमध्ये तुरंगवास सुद्धा होऊ शकतो.
खरं तर तुम्हाला वाहतुकीचे अनेक नियम माहिती असतील. टू व्हीलर, फोर व्हीलर तसेच इतर मालवाहतूक वाहन चालवण्याचे वाहतुकीचे नियम तुम्ही तोंड पाठ करून ठेवले असतील.
पण ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या संदर्भातील वाहतुकीचे नियम तुम्हाला माहिती आहेत का ? शेतकऱ्यांच्या बांधावर उभ्या असणाऱ्या ट्रॅक्टरच्या संदर्भातील वाहतुकीचे नियम अनेकांना ठाऊक नसतात. दरम्यान आज आपण ट्रॅक्टरच्या संदर्भातील वाहतुकीचे नियम थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ट्रॅक्टर चालवताना ही चूक केली तर एक लाख रुपयाचा दंड भरावा लागणार!
ट्रॅक्टरच्या बाबतीतील वाहतुकीच्या नियमानुसार ट्रॅक्टर-ट्रॉलीचा व्यावसायिक वापर केला तर. त्यामुळे ट्रॅक्टर मालकावर कारवाईची तरतूद आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्याला एक लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
खरेतर देशातील बहुतांश ट्रॅक्टरची नोंदणी केवळ शेतीच्या कामासाठी केली जाते. ज्याचा वापर फक्त शेतीच्या कामासाठी करता येतो, परंतु ट्रॅक्टर-ट्रॉलीचा व्यावसायिक वापर केला तर. त्यामुळे ट्रॅक्टर मालकावर कारवाईची तरतूद आहे.
ज्या अंतर्गत शेतकऱ्याला एक लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. ट्रॅक्टर-ट्रॉलीचा व्यावसायिक वापर केल्यास ओव्हरलोडिंग, फिटनेस आणि परमिट नसल्यामुळे दंड आकारला जातो.
शेतीच्या कामादरम्यान ओव्हरलोड माल टाकला तरी शेतकऱ्यांकडून दंड वसूल करण्याची तरतूद कायद्यात आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीचा वापर शेतीच्या कामाव्यतिरिक्त प्रवासी वाहतूक करण्यासाठी केल्यास ट्रॅक्टर मालकाकडून प्रति प्रवासी 2200 रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो.
कोणत्याही अनधिकृत वाहनाने प्रवाशांना नेले जाऊ शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे ट्रॅक्टर सोबतच ट्रॉलीची सुद्धा नोंदणी करावी लागते. ट्रॅक्टर चालवण्यासाठी लायसन्स देखील लागते.
हलके मोटार वाहन (LMV) ड्रायव्हिंग परवानाधारक ट्रॅक्टर चालवू शकतात. दरम्यान जर ट्रॅक्टर संदर्भातील या वाहतुकीच्या नियमांचे पालन झाले नाही तर ट्रॅक्टरचालकावर कायदेशीर कारवाई होऊ शकते अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.
म्हणजे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर चालवताना एक चूक केली तर त्यांना तब्बल एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.