Crop Insurance : मित्रांनो शेतकरी बांधवांना (Farmer) नेहमीच नैसर्गिक आपत्तीमुळे (Climate Change) नेहमीच संकटांना तोंड द्यावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत शासनाकडून काही योजना (Farmer Scheme) देखील सुरू करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे काम शासनाकडून केले जाते.
प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Mantri Pik Bima Yojana) ही देखील अशीच एक महत्त्वाची योजना (Yojana) आहे. या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई (Compensation) दिली जाते. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे या वर्षी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
यामुळे शेतकरी बांधवांचे आर्थिक बजेट पूर्णतः कोलमडले आहे. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे. सोबतच पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत देखील आता शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे.
मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना 25% आगाऊ रक्कम जारी करण्यात येणार आहे. यासंदर्भात मायबाप शासनाकडून अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता शेतकरी बांधवांच्या मनात नेमकी ही रक्कम कोणाला मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आज आपण नुकसान भरपाईची 25% आगाऊ रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो पिक विमा योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमध्ये अनेक तरतुदी आहेत. या योजनेच्या नियमावलीनुसार, कोणत्याही महसूल मंडळाचे किंवा शेतकऱ्याचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले असल्यास अशा शेतकरी बांधवांना 25 टक्के नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. अशा परिस्थितीत नागपूर जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे पंचनामे करून अहवाल मायबाप शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
दरम्यान मायबाप शासनाने 50 टक्केपेक्षा अधिक सोयाबीन तूर आणि कापूस या शेती पिकाचे नुकसान झाले असल्यास 25% आगाऊ रक्कम देणे बाबत अधिसूचना जारी केली आहे. यासंदर्भात संबंधित पिक विमा कंपनीला देखील सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या तरतुदीनुसार आता एक महिन्याच्या आत संबंधित शेतकरी बांधवांना 25 टक्के नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम देणे बाबत अधिसूचना जारी झाली आहे. निश्चितच यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांचे संपूर्ण नुकसान भरून निघणार नाही मात्र यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.