Farmer Success Story : आजच्या युगात चांगली पदवी घेऊनही नवयुवक रोजगारासाठी इकडे तिकडे भटकत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर काही लोक असे आहेत जे चांगली नोकरी सोडून स्वयंरोजगार करून लाखोंची कमाई करत आहेत. विशेषता शेतीशी निगडित व्यवसाय (Agriculture Business) करून लाखो कमवत आहेत.
राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील कमल मीना यांनी देखील इंजिनिअरच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवून शेतीशी (Agriculture) निगडित व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी इंजीनियरिंग सोडल्यानंतर गावात गाय पालन सुरु केलं आहे. आता तो गाईच्या दुधापासून शेणापर्यंतचे पदार्थ बनवून चांगली कमाई (Farmer Income) करत आहे. यासोबतच फार्म हाऊसमध्ये सेंद्रिय शेतीही (Organic Farming) केली जात आहे. त्यातून त्यांना अतिरिक्त कमाई होत आहे.
कमल मीना यांनी सांगितले की, त्यांना दिल्ली महानगरपालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून नोकरी मिळाली होती, पण गाव आणि पशुपालनाची (Animal Husbandry) ओढ यामुळे त्यांना दिल्लीसारख्या महानगरात काही आवडले नाही. यानंतर 2018 मध्ये नोकरी सोडून उछान शहराजवळील पाणा गावात आले आणि 15 बिघा जागेत लोहगड फार्म हाऊस बांधले. त्यांनी गुजरातमधून गीर जातीच्या चार गायी येथे आणून त्यांचे संगोपन (Cow Farming) केले. तसेच सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. या कामात त्यांची पत्नी विरमा देवीही त्यांना साथ देत आहेत.
एक गाय वर्षाला अडीच लाख रुपये कमवते
कमल मीना यांनी सांगितले की, पद्मश्री सुभाष पालेकर यांना ते भेटले आहेत. सुभाषजीनी कमल यांना गुजरातच्या रमेश रुपालीया यांना भेटण्यास सांगितले. त्यानंतर गुजरातला जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच त्याचा गोठा पाहिला व तेथे प्रशिक्षण घेतले. त्यांच्याकडून गीर जातीच्या चार गायी आणून त्यांनी सुरुवात केली. आज त्यांच्या फार्म हाऊसमध्ये 25 गायी आहेत. एका गायीपासून ते दरवर्षी 2.5 लाख रुपये कमावत आहेत.
म्हणजे 62 लाख रुपये ते गाय पालनातून कमावतात. याशिवाय ते शेणापासून बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्ती, भांडी, दिवे, अगरबत्ती, शुभ लाभ पुतळा, लाकूड अशा 55 वस्तूंची विक्री करतात. प्रत्येक उत्पादनाची किंमत 1 रुपये ते 50 रुपये आहे. त्याचबरोबर गायीचे दूध 50 रुपये प्रतिलिटर आणि तूप 2500 रुपये किलो दराने विकले जात आहे. कमल मीना एका गायीच्या देखभालीवर वर्षाला 35 ते 50 हजार रुपये खर्च करतात.
सेंद्रिय शेतीमाल विकत आहेत :-
गाई पालनासोबतच शेणखताने सेंद्रिय शेती करत असल्याचे त्यांनी सांगितले. बाजरी, ऊस, ज्वारी, पेरू, मनुका याशिवाय अनेक प्रकारच्या भाज्याही फार्म हाऊसमध्ये पिकवल्या जातात. त्यांनी पिकवलेल्या भाज्यांमध्ये फ्लॉवर, कोबी, भिंडी, पालक, मेथी, कोथिंबीर, भोपळा, घ्या, सीताफळ, मिरची यांचा समावेश होतो. त्याचवेळी झिंक आयर्न असलेला काळा गहू 8 हजार रुपये प्रति क्विंटल, मोती दाणे असलेला बोडका गहू 6 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला जात आहे.
कमल यांच्या पत्नी विरमा देवी यांनी सांगितले की, आम्ही येथे अनेकांना रोजगार दिला आहे. शेणापासून बायो गॅस बनवून ते वीज वाचवतात. त्यांच्या फार्म हाऊसमध्ये बसवलेली सर्व मशीन्स बायो गॅसवर चालतात. राजस्थान व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशातूनही आमच्याकडून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना मागणी येत आहे. नैसर्गिक शेतीतून वार्षिक उत्पन्न सुमारे एक कोटी रुपये आहे.